What is Cryogenic Tank: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मेडिकल ऑक्सीजनचं संकट वाढलं आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ऑक्सीजन न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे. देशभरातील ऑक्सीजन उत्पादक प्लांटमधून टॅंकरने हॉस्पिटलपर्यंत ऑक्सीजन पोहोचवलं जात आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्गाने ऑक्सीजन टॅंकचं ट्रान्सपोर्टेशन केलं जात आहे.
प्लांट्समधून क्रायोजेनिक टॅंकरमध्ये ऑक्सीजन भरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचलं जात आहे. पण हे क्रायोजेनिक टॅंक कसे असतात तुम्हाला माहीत आहे का? ज्या टॅंकशिवाय लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचं ट्रान्सपोर्टेशन शक्य नाही. यांची काय खासियत आहे आणि कोरोना काळात त्यांची भूमिका काय? हे जाणून घेऊ...
क्रायोजेनिकचा अर्थ काय?
हा क्रोयोजेनिक शब्द ग्रीक, लॅटिन आणि इंग्रजी या तीन भाषेतून तयार झाला. ग्रीक शब्द क्रिएला लॅटिन भाषेत क्रायो समजलं जातं, ज्याचा अर्थ फार थंड असा होतो. इंग्रजीत क्रायोजेनिकचा अर्थ फार जास्त थंड ठेवणारा असा होतो. म्हणजे या क्रायोजेनिक टॅंकचा अर्थ झाला फार जास्त थंड ठेवणारं पात्र किंवा टाकी.
काय असतात हे क्रायोजेनिक टॅक?
हा एक असा टॅंक असतो ज्यात असा गॅस ठेवला जातो ज्याला फार जास्त थंड ठेवावं लागतं. जसे की, लिक्विड ऑक्सीजन, लिक्विड हायड्रोजन, नायट्रोजन, हीलियम इत्यादी. लिक्विड ऑक्सीजन फार जास्त थंड असतं. क्रायोजेनिक टॅंकमध्ये असा गॅस ठेवला जातो ज्याला गरम केल्यावर तापमान मायनस ९० पेक्षा अधिक होतं. ऑक्सीजन टॅकमध्ये मायनस १८५ ते मायनस ९३ तापमान ठेवलं जातं. क्रायोजेनिक टॅंक नसेल तर लाखो लोकांचा जीव धोक्यात येईल. हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सप्लाय केला जाऊ शकणार नाही.
कशी असते रचना?
क्रायोजेनिक टॅंक बाहेरून पाहिला तर सामान्य टॅंकसारखा दिसतो. पण याची बनावट फार किचकट असते. याला एकप्रकारे व्हॅक्यूमच्या सिद्धांतानुसार तयार केलं जातं. या टॅकमध्ये दोन मजबूत थर असतात. एक बाहेरून आणि एक आतून. आतल्या थराच्या टॅंकमध्ये लिक्विड ऑक्सीजन भरलं जातं. दोन्ही थरांमध्ये व्हॅक्यूम असतं. जेणेकरून बाहेरची उष्णता आतील गॅसवर परिणाम करणार नाही.
अचानक यांची कमतरता का आली?
भारतात अनेक कंपन्यांकडे असे साधारण १५०० ट्रान्सपोर्टं कॅरिअर टॅंक आहेत. मात्र सध्या त्यातील केवळ १३०० इतकेच टॅंक व्यवहारात आहेत. कोरोना महामारी नसती आली तर सामान्यपणे देशात ऑक्सीजनचा रोजचा वापर ७०० मेट्रिक टन इतकाच होतो. ज्यासाठी १३०० टॅंक भरपूर आहेत. गेल्यावर्षी कोरोना आल्यावर ऑक्सीजनचा वापर २, ८०० मेट्रिक टनवर गेला. त्यावेळी स्थिती मॅनेज केली गेली होती. पण यावेळी ऑक्सीजनचा वापर ६ हजार मेट्रिक टन इतका रोज होत आहे. त्यामुळे टॅंकरची कमतरता भासत आहे.