जगात अनेक प्रकारचे आणि तेवढेच खतरनाक विषारी जीव आहेत. यातील काही जीव तर असेही असतात ज्यांना केवळ स्पर्श केल्याने विष पसरण्याची भीती असते. काही विषारी जीव ग्रामीण भागात दिसणं सामान्य बाब आहे. शेतात साप आणि विंचू दिसणं फारच सामान्य आहे. लोक यांना सहजपणे मारतात किंवा दूर सोडून देतात. पण शेतात सापडणाऱ्या विंचवापेक्षा जास्त खतरनाक एक विंचू असतो. हा विंचू सर्वात जास्त विषारी असतो.
हे विंचू क्यूबामध्ये (Cuban Scorpion) आढळतात आणि यांचा रंग निळा असतो. यांचं विष अनेक प्रकारची औषधं तयार करण्याच्या कामात येतं. त्यामुळे हे विंचू जेवढे खतरनाक आहेत तेवढेच किंमतीही आहेत. यांच्या विषाची किंमत लाखो नाही तर कोट्यावधी रूपयात आहे. थायलॅंडमध्ये आढळणाऱ्या किंग कोब्राच्या विषापेक्षाही जास्त या विंचूच्या विषाची किंमत आहे. किंग कोब्राचं विष ३० ते ३२ कोटी रूपये प्रति लिटरमध्ये मिळतं, तर निळ्या रंगाच्या Cuban Scorpion च्या विषाची किंमत ७६ कोटी रूपये प्रति लीटर असते.
या Cuban Scorpio विषात ५० लाखांपेक्षा जास्त तत्व असल्याने या विषाचा वापर छोट्या आजारांच्या नाही तर कॅन्सरचं औषध 'Vidatox' बनवण्यासाठी केला जातो. या औषधाबाबत क्यूबातील लोक सांगतात की, याने कॅन्सरसारखा आजार मुळापासून बरा केला जाऊ शकतो. तसेच वेगवेगळ्या औषधांमध्येही याचा वापर केल्यास फायदा होत असल्याचा दावा केला जातो.
या Cuban Scorpio च्या विषाचा वापर अनेक मेडिकल रिसर्च आणि ट्रीटमेंटसाठी होतो. कारण यात काही असे तत्व आहेत, जे पेनकिलरचं काम करतात. याने हाडांचा आजार आर्थरायटिसचं दुखणं कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच Cuban Scorpio च्या विषातील काही तत्वांमुळे कॅन्सर रोखण्यास मदत मिळते, असा दावा केला जातो.
फ्रेड हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, या निळ्या रंगाच्या विंचवाचं विष अंग प्रत्यारोपण द्वारे जेव्हा शरीरात एखादा नवा अवयव ट्रान्सप्लान्ट केला जातो तेव्हा बॉडी त्याला रिजेक्ट करते. अशात सिंथेटिक बदल शरीराने स्वीकारावा यासाठी त्या रूग्णाच्या शरीरात या विंचवाचं विष इंजेक्ट केलं जातं. याने शरीराची इम्यून सिस्टीम वेगाने काम करू लागते आणि शरीराने अवयव रिजेक्ट करण्याची शक्यता राहत नाही.