शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

Cursed Movie: 'या' चित्रपटाच्या कथेला मिळाला शाप; स्टोरी वाचून 6 जणांचा संशयास्पद मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 2:47 PM

Haunted Story: तुम्ही आतापर्यंत अनेक भीतीदायक गोष्टी ऐकल्या असतील. पण, ही एक सत्य घटना आहे. वाचा नेमकं काय झालं...

Atuk Horror Movie: काही चित्रपट अभिनेत्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, काही त्यातील गाण्यांसाठी, तर काही कथेसाठी लक्षात राहतात. पण आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो त्याच्या शापित कथेमुळे ओळखला जातो. 'अटुक' (Atuk)असे या चित्रपटाचे नाव असून, हा हॉलिवूडचा असा चित्रपट आहे, जो कधीही तयार झाला नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?या चित्रपटात नायकाची भूमिका करण्यासाठी ज्या अभिनेत्याने स्क्रिप्ट वाचली, त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. तुमचा यावर विश्वास बसणार नाही किंवा तुम्ही याला योगायोग म्हणू शकता. मात्र एकामागून एक मृत्यू पाहिल्यावर, चित्रपटसृष्टीतील(Film Industry)  सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. स्क्रिप्टची सुरुवात कॅनेडियन लोकगीताने(Canadian Folklore)  होते.

धक्कादायक सत्य कथालोककथेनुसार, एक मुलगा अलास्कामध्ये आलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगा तिच्या मागे न्यूयॉर्कला जातो आणि मोठा माणूस बनतो. पण तो त्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की, तो सर्वस्व गमावून मरतो. या गाण्यावर एक कादंबरी (The Incomparable Atuk) देखील लिहिली गेली. यानंतर दिग्दर्शक नॉर्मन ज्यूसन (Norman Jewison)यांनी पटकथा लेखक टॉड कॅरोल यांना हा चित्रपट लिहिण्यास सांगितले, सुमारे 2 वर्षांनी चित्रपटाची कथा तयार झाली. 

6 जणांचा मृत्यू झालाकॉमेडियन अभिनेता जॉन बेलुशीचा (John Belushi)स्क्रिप्ट वाचल्यानंतर काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर कॉमेडियन अभिनेता सॅम किनिसनचा (Sam Kinison) कार अपघातात आणि जॉन कॅंडीचा (John Candy)हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. या दोघांनीही चित्रपटाची कथा वाचली होती. या मृत्यूंमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय स्क्रिप्ट देणारी व्यक्ती मायकल ओ'डोनोघ्यू  (Michael O'Donoghue) देखील मृत्यू आढळून आली. असे मानले जाते की ख्रिस फार्ले आणि जॉन हार्टमन हे दोन्ही अभिनेते या शापित स्क्रिप्ट (Damned Script)वाचल्यामुळे मरण पावले. या मृत्यूनंतर चित्रपट कायमचा बंद झाला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयHollywoodहॉलिवूड