दिवसेंदिवस लहानांमध्येच नाही तर मोठ्यांमध्ये सुध्दा मोबाईलच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. त्याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम मुलांवर होत आहे. ही समस्या भारतातच नाही तर जगभरातील सगळ्या देशांमध्ये सर्वाधिक दिसून येते. कॅनडामध्ये सुध्दा असाच प्रकार घडला . जेमी नावाच्या एका कॅनडात राहत असलेल्या व्यक्तीचा मुलगा सुध्दा मोबाईलचा वापर खूप करत होता. दिवसरात्र त्याच्या चेहरा आणि मोबाईल एकमेकांसमोरचं असायचे. त्यामुलाचे नाव खोबे आहे. तसंच त्या मुलाच्या वडीलांनी मोबाईलचा नाद सोडण्यासाठी काय केले ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
त्यांनी आपल्या मुलासोबत मंगोलीया जाण्याचे ठरवले. जुलैमध्ये ते दोघं आपल्या बाईकने मंगोलियाला जाण्यसाठी निघाले. एका महिन्यात त्यांनी २ हजार २०० किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासाने या दोन पिता- पुत्राच्या आयुष्यात मोठा बदल घडला. खास करून मुलाच्या आयुष्यात बदल घडून आला. कारण आधी त्याच्या हातात सतत मोबाईल असायचा आणि आता त्याने तब्बल महिनाभर मोबाईल वापरला नव्हता.
हे दोघे मंगोलियाच्या अशा ठिकाणी गेले होते. ज्याठिकाणी फक्त पर्वतांच्या रांगा होत्या आणि इंटरनेट जराही चालत नव्हते. त्यामुळे मोबाईल वापरला नव्हता. त्यामुळे निसर्गाच्या आणि वडीलांच्या सहवासात हा मुलगा होता.
या मुलाचे वडील असं सांगतात कि या आधी असं कधीच झालं नव्हतं की फोन वापरला नाहीये. पण या ट्रिपमुळे खूप बदल घडून आला. या सगळ्यात त्यांच्या मुलाला नातं समजण्यास सुरूवात झाली. त्यांना असं वाटलं सुद्धा नव्हतं की आपल्या मुलामध्ये सकारात्मक बदल घडून येईल. ही ट्रीप त्यांच्यासाठी खूप आनंददायी आणि आयुष्य बदलून टाकणारी ठरली. त्याांनी त्यांच्या मुलाची मोबाईलची सवय सोडण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला.