सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदारांना त्यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. त्यासाठी कुणी पैशांचा वापर करतंय, तर कुणी दारूचं वाटप करतं, तर कुणी लहान लेकरांची ढुंगणंही धूत आहेत. अशातच एका नेत्याने मात्र फारच वेगळी मत मागण्यासाठी फारच वेगळी शक्कल लढवली आहे.
भारताप्रमाणेच डेनमार्कमध्येही निवडणूका होत आहेत. Time च्या रिपोर्टनुसार, Center-Right Liberal Alliance Party चे खासदार Joachim B. Olsen ने थेट पॉर्न वेबसाइट Pornhub वरच जाहिरात दिली आहे.
Joachim ने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. Fox News नुसार, Joachim म्हणाले की, निवडणुकीचा प्रचार ही फारच सीरिअस बाब आहे. पण यात थोडी गंमत-मस्तीही व्हायला पाहिजे. डेनमार्कमध्ये ५ जून रोजी निवडणुका होणार आहेत.
Joachim हे ऑलम्पिकमध्ये शॉर्ट पूट खेळाडू म्हणूण सहभागी झाले होते. इतकेच नाही तर या खेळात त्यांना सिल्हर मेडलही मिळालं होतं. त्यांनी पॉर्नहबवर “vote for Jokke” अशी जाहिरात दिली आहे. Jokke हे Joachim यांचं टोपण नाव आहे.
Joachim ने टाइमशी बोलताना सांगितले की, 'इंटरनेटवर अर्ध्या वेबसाइट पॉर्न आहेत. त्यामुळे जिथे मतदार आहेत, तिथे तुम्ही असणं गरजेचं आहे. मग ती पॉर्न साइट का असेना'. पॉर्नहब या वेबसाइटवर रोज १०० मिलियन यूजर्स भेट देतात. डेनमार्क हा देश पॉर्नहबला भेट देणाऱ्यांच्या यादीत २८व्या क्रमांकावर आहे.