सोशल मीडियामुळे (Social Media) आजच्या काळात कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. हे असे व्यासपीठ आहे, ज्याच्या मदतीने जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणारी घटना क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत पसरते. यामुळे, आजच्या युगात जग खूप लहान भासू लागले आहे. सुरुवातीला फक्त माणसं सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायची, पण आता तर इन्स्टावर कुत्रे-मांजरी देखील लोकप्रिय (Insta Famous Dogs-Cats) होत आहेत. आम्ही ज्या कुत्र्याबद्दल बोलत आहोत त्याला कदाचित तुमच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील. ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) हार्टलपूलमध्ये (Hartlepool) राहणाऱ्या एका क्यूट कुत्र्याची.
सध्या सोशल मीडियावर एक गोंडस कुत्रा खूप चर्चेत आहे. टेडी (Tedy) नावाच्या या कुत्र्याची दाढी इतकी सुंदर आहे की प्रत्येक जण त्याचे कौतुक करत राहतात. टेडीची दाढी जमिनीपर्यंत लांब लोंबकळते. ती महिन्याला ट्रिम करावी लागते, तर दररोज त्यातून कंगवाही फिरवावा लागतो. टेडी आपल्या स्टायलिश लूक आणि व्यक्तिमत्त्वाने लोकांची मने जिंकत आहे. टेडीच्या दाढीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्याची मालकीण निकोला विलकॉक्स हिला त्याचे लूक मेंटेन ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
टीम डॉग्जच्या अहवालानुसार, निकोलाला टेडचा सुपरकूल लूक टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ५० वर्षीय निकोला महिन्यातून एकदा टेडीची दाढी आणि शेपटीचे केस ट्रिम करते. यासह, त्याचे केस दररोज एक तास विंचरावे लागतात. निकोलाने सांगितले की लोक टेडला पाहताच त्याचं कोडकौतुक करायला लागतात. तो जिथून जातो तिथे लोक थांबतात आणि त्याला हाक मारु लागतात.
निकोलाच्या मते, टेडला सांभाळणे खूप कठीण आहे. त्याची दाढी इतकी मोठी होते की ती जमिनीपर्यंत घासू लागते. त्याची दाढी पाहून लोकांना आश्चर्य वाटते. निकोलाला पाच वर्षांचा ग्रूमिंगचा अनुभव आहे. टेडी ९ वर्षांचा आहे. त्याची दाढी खूप लांब वाढते. अशा परिस्थितीत त्याचे ट्रिमिंग महिन्यातून एकदा आवश्यक असते. मात्र, या दाढीमुळे तो चर्चेत आहे. टेडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.