उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील एका परिवारातील एक अजब घटना समोर आली आहे. इथे सूनेच्या गुटखा खाण्याच्या सवयीने लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पतीसहीत घरातील सगळेच लोक महिलेला गुटखा न खाण्याबाबत समजावत होते. पण तिने कुणाचं काही ऐकलं नाही. ती पदराखाली लपून लपून गुटखा खात राहिली.
तेच महिलेने आपल्या पतीवर दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर तिने पोलिसात लिखित तक्रारही दिली. ज्यानंतर हे प्रकरण परिवार सल्ला केंद्रात पाठवण्यात आलं.
यादरम्यान वादातून एक नवीन बाब समोर आली. पतीने आपल्या पत्नीवर गुटखा खात असल्याचा आरोप केला. पतीने पत्नीला गुटखा न खाण्यासाठी अनेकदा समजावलं. पण त्याने सांगितल्यावर पत्नी गुटखा खात राहिली.
या गोष्टीमुळे हैराण पती म्हणाला की, त्याची पत्नी सकाळी झोपेतून उठताच पदराखाली गुटखा खात घरातील कामे करते आणि इतके-तिकडे थुंकत असते. परिवाराने याचा अनेकदा विरोध केला, पण तिने ऐकलं नाही. वैतागून मी पत्नीला सोडलं. त्यामुळे ती आता माझ्यावर खोटे आरोप लावत आहे.
छत्ता भागातील एका तरूणीचं लग्न शाहगंज भागातील एका तरूणासोबत झालं होतं. पण सासरी आल्यावरही सून गुटखा खात होती. मनाई केल्यावरही तोंड पदराखाली लपवून गुटखा खात राहत होती. इकडे-तिकडे थुंकल्यावर ती पकडली गेली. घरातील लोकांनी समजावलं पण तिने ऐकलं नाही. अशात पती आणि तिच्या माहेरच्या लोकांमध्ये भांडण झालं. वेळ अशी आली की, पतीने पत्नीला सोडलं.
यादरम्यान पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले. तिचा दावा आहे की, पती गुजरातमध्ये काम करतो. त्याचे गुजरातमध्ये एका तरूणीसोबत अनैतिक संबंध आहेत. पतीच्या मोबाइलमध्ये तिला तरूणींचे नंबर दिसले आणि त्याला त्यांच्यासोबत बोलताना ऐकलं. इतकंच नाही तर अजूनही बाळ झालं नाही म्हणून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली.
दुसरीकडे यावर काउन्सेलर डॉ. अमित गौड म्हणाले की, एका परिवारातील महिला गुटखा खात असल्याने तिचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. पतीची ईच्छा आहे की, पत्नीने गुटखा खाणं सोडावं. सध्या आम्ही त्यांना समजावून यावर उपाय देण्याचा प्रयत्न करत आहोत.