सासू-सून म्हटलं की भांडण आलचं. या एकाच विषयाला धरून अनेक विनोद, सिनेमे आणि मालिकाही करण्यात आल्या आहेत. परंतु एक सासू सूनेसोबतच्या भांडणामुळे चक्क लखपती झाली आहे. ऐकून धक्का बसला असेल ना? भांडल्यामुळे लखपती कसं कोणी होऊ शकतं? असे अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं असेल. ही गोष्ट आहे आंध्रप्रदेशमधील नालगौंडातील मिरयालगुडा परिसरातील रहिवाशी असणाऱ्या एका सासूची.
वद्ध सासूला तिच्या सूनांनी इतका त्रास दिला की, त्यामुळे ती बिचारी भिक मागण्यासाठी हतबल झाली. परंतु म्हणतात ना, नशीबाने साथ दिली तर त्यापुढे कोणाचे काही चालत नाही. परंतु भिक मागून ही सासू एकाच दिवसात लखपती झाली.
लखपती झालेल्या सासूचे नाव पेंतम्मा असून तिला दोन मुलं आहेत. तिच्या पतीच्या निधनानंतर ती आपल्या उपजीविकेसाठी पूर्णपणे मुलांवर अवलंबून होती. तिच्या पतीची थोडीशी जमिन होती. ती विकून तिला दोन लाख रूपये मिळाले होते. त्यातील एक लाख तिने दोन मुलांना दिले आणि एक लाख स्वतःजवळ ठेवले. काही दिवसांतच तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर एका मुलगा घरातून पळून गेला. त्यानंतर या दोन्ही मुलांच्या पत्नींनी आपल्या सासूला त्रास देण्यास सुरूवात केली. सतत तिला घालून पाडून बोलणं, वेळेवर जेवणं न देणं अशा अनेक गोष्टी तिला सतावण्यासाठी या सूना करू लागल्या. सूनांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने एक दिवस घर सोडून दिलं आणि हैद्राबादला निघून आली.
हैद्राबादला आल्यानंतर उपासमार होऊ नये म्हणून पेंतम्माने भिक मागण्यास सुरूवात केली. ती दररोज भिक मागून आपलं पोट भरत असे. एकदा पोलिसांनी एका अभियानांर्तंगत तिची चौकशी केली. त्यावेळी पोलिसांनाही धक्का बसला. त्यावेळी पेंतम्माकडे 2 लाख 34 हजार रूपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन तर काही चांदिचे दागिने मिळाले. पोलिसांना पेंतम्माने तिची संपूर्ण कहानी सांगितली. त्यांनी तिची मदत केली. सर्वात आधी तिला बँकेत एखा अकाउंट ओपन करून दिलं. तिचे सर्व पैसे त्यामध्ये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तिला एका पुनर्वसन केंद्रामध्ये भरती केलं.