पोलीस एन्काउंटरमध्ये मारण्यात आलेल्या गुन्हेगाराची कबर दोन वर्षानी खोदलेली आढळून आली. कबरेतून त्याची मृतदेहही गायब होता. जेव्हा याची चौकशी केली गेली गेली तेव्हा हैराण करणारं सत्य समोर आलं. समोर आलं की, कबर खोदण्याचं काम एका 15 वर्षाच्या मुलीने केलं होतं. ती म्हणाली की, तिला एक स्वप्न दिसलं होतं की, कबरेत जिवंत व्यक्ती तिला मदत मागत आहे. ही घटना ब्राझीलच्या गोइआस राज्यातील आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 27 वयाचा लाजारो बारबोसा डी सूसा शहरातील वॉन्टेड गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या, रेप, मारहाण आणि अपहरणाच्या अनेक केसेस होत्या. 9 जून 2021 ला सीलॅंडियामध्ये एका परिवारातील चार लोकांची हत्या करून तो फरार झाला होता. या घटनेच्या एक महिन्यानंतर पोलिसांनी एका एन्काउंटरमध्ये त्याला मारलं होतं.
पण मृत्यूच्या दोन वर्षांनंतर आता बारबोसा नावाची पुन्हा चर्चा होता आहे आणि याचं कारण आहे त्याची कबर खोदली जाणं. असं सांगण्यात आलं की, 15 वर्षाच्या एका मुलीने त्याची कबर खोदून त्याचा मृतदेह बाहेर काढला. जेव्हा लोकांना कबरेतून मृतदेह गायब झाल्याचं समजलं तेव्हा एकच गोंधळ उडाला.
आता पोलिसांनी चौकशी करून जो खुलासा केला तो फारच धक्कादायक आहे. पोलिसांनी सांगितलं की, 15 वर्षाच्या मुलीने तिच्या मित्रासोबत मिळून कबर खोदली होती. चौकशीत मुलीने सांगितलं की, बारबोसा तिच्या स्वप्नात आला होता आणि मदतीची भीक मागत होता. तो म्हणाला की, तो जिवंत आहे आणि त्याला बाहेर काढलं जावं. त्यानंतर तिने 21 वर्षीय मित्रासोबत मिळून कबर खोदली आणि बारबोसाचा मृतदेह बाहेर काढला.
चौकशी करत असलेले अधिकारी राफेल नेरसि यांनी मीडियाला सांगितलं की, मुलगी अल्पवयीन आहे. तिच्या नावाचा खुलासा केला जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर तिचा शोध घेण्यात आला आणि अलिकडेच तिला अटक केली. तिने स्वप्न पाहिल्यानंतर कबर खोदण्याचं कबूल केलं आहे.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, मुलीला तिचा 21 वर्षीय मित्र स्मशानभूमीत घेऊन गेला होता. तेथील माती दोघांच्या कपड्यांना लागली होती. चौकशीनंतर त्याचा मृतदेह पुन्हा दफन करण्यात आला आहे. पोलीस आरोपी मुलीच्या पालकांच्या संपर्कात आहे.