चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:22 AM2021-05-14T10:22:45+5:302021-05-14T10:28:37+5:30
इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं.
(Image Credit : Aajtak)
कोरोनाच्या थैमानात अनेक विचित्र किंवा अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणांहून आधी मृत घोषित केलेले अनेक लोक ऐन चितेवर टाकल्यावर जिवंत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, स्मशानभूमीत डॉक्टर पोहोचले आणि अॅम्बुलन्सही. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केलं. पण तरीही परिवारातील लोक मानायला तयार नव्हते. ते मृत व्यक्तीला पुन्हा जिल्हा रूग्णालयात घेऊन गेले. तिथेही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हे पण वाचा : बेटा अज्जू, चाय पिला दे....; मृत आजी अचानक बोलू लागली; सगळ्यांची उडाली घाबरगुंडी)
ही घटना अशोक नगरमधील आहे. अनिल जैन नावाच्या व्यक्तीची तब्ये बिघडल्याने त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. साधारण १५ दिवसांपासून तो हॉस्पिलमध्ये भरती होता. मृतकाच्या भावाने सांगितलं की, त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि गुरूवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण जेव्हा आम्ही त्याला स्मशानभूमीत घेऊन गेलो तेव्हा त्याच्या शरीरात हालचाल झाली आणि ओम, ओम असा आवाजही आला. इतकंच नाही तर तो चितेवरून उठून बसला.
त्यानंतर तिथे डॉक्टरांची टीम आली. त्यांनी अनिल जैनला मृत घोषित केलं. कुटुंबियांनी आरोप केला आहे की, जिल्हा हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्ती जिवंत होता. कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनावर बेजबाबदारपणाचे आरोप लावले आहेत.
तेच सिव्हिल सर्जन म्हणाले की, हे चुकीचं सांगणं आहे की, तो जिवंत आहे. मृतकाला स्मशानभूमीतून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणल्यावरही चेक केलं गेलं. तेव्हाही ती व्यक्ती मृत होती. कुटुंबियांनी लावलेले आरोप निराधार आहेत.