जगभरातून नेहमीच अशा काही घटना रोज समोर येत असतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. अशीच एक कल्पनेपलिकडची घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत लग्नाचा 35वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका क्रूजवर गेले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्याच्या पायाच्या अंगठ्यात एका कोळीने अंडी दिली.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, यूनायटेड किंगडमचे कॉलिन ब्लेक आणि त्यांची पत्नी फ्रान्सच्या मार्सिलेमध्ये सायंकाळ एन्जॉय करत होते. तेव्हा त्यांना दिसलं की, त्यांचा पायाचा अंगठा सूजला आणि रंग जांभळा झाला आहे.
अंगठ्याची ही अवस्था बघून ते घाबरले आणि जहाजावरील डॉक्टरांना भेटले. तेव्हा समजलं की, पेरूतील एका कोळीने त्यांना दंश केला आणि त्यांच्या पायाच्या अंगठ्यात अंडी दिली होती. अंगठ्यातून विषारी पदार्थ आणि अंडी बाहेर काढण्यासाठी औषधं देण्यात आली आहे. त्यानंतर ते बरे होण्याची आशा आहे.
एका आउटलेटनुसार, क्रॅमलिंगटन येथे राहणारे ब्लेक यांना कोळीने तेव्हा दंश केला जेव्हा ते पत्नीसोबत जेवणाचा आनंद घेत होते. ते म्हणाले की, त्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. कारण कोळी अंडी देण्याआधी शिकारीला सुन्न करते. ते म्हणाले की, माझ्या पत्नीला वाटलं की, माझ्या नवीन सॅंडलमुळे अंगठा सूजला असेल.
जहाजावरील डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा अंगठा एका चाकूसारख्या वस्तूने कापला. ज्यातून दुधासारखं द्रव्य बाहेर आलं. असं वाटत होतं की, यात चहाची पावडरही होते. पण मुळात ती कोळीची अंडी होती.
यूकेला परत आल्यावर ब्लेक यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि सूज कमी करण्यासाठी त्यांना अॅंटी-बायोटिक कोर्स देण्यात आला. सूज कमी झाल्यावर विष पायातून निघालं होतं आणि कोळीचे काही निशाण दिसत होते.
पण चार आठवड्यांनंतर त्यांना अंगठ्यावर काही आणखी असामान्य बाब दिसली. डॉक्टरांना समजलं की, अंड्यांपैकी एकामधून एक छोटी कोळी बाहेर निघाली होती. जी त्वचेमध्ये अडकली होती. ब्लेक यांनी बीबीसीला सांगितलं की, कोळीच्या अंड्यांपैकी एक जे साफ करण्यात आलं नव्हतं आणि ते फुटलं होतं. त्यांचं मत आहे की, कोळी मार्ग शोधत होती आणि माझ्या पायाचा अंगठा खात होती. अॅंटी-बायोटिक्सने कोळी मारल्यानंतर डॉक्टरांनी ब्लेक यांच्या पायाच्या अंगठा कापून बाजूला केला.