शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कस्टमरच्या घराबाहेर डिलिव्हरी बॉयने केलं किळसवाणं कृत्य, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:25 PM

डिलीव्हरी बॉय आपलं फूड पार्सल घेऊन येतात. पण हे डिलीव्हरी बॉय काय करतील याचा नेम नाही. याआधी डिलीव्हरी बॉयचे बरेच प्रताप समोर आले आहेत. आता असाच एक डिलीव्हरी बॉय चर्चेत आला आहे.

 भूक लागली आणि घरी कुणी काही बनवून देणारं नसेल, आपल्यालाही घरात काही बनवायचा किंवा बाहेर जाऊनही काही खाण्याचा कंटाळा आला असेल तर आपण पटकन ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. काही मिनिटांतच आपल्याला जे खायला हवं ते घरपोच मिळतं. डिलीव्हरी बॉय आपलं फूड पार्सल घेऊन येतात. पण हे डिलीव्हरी बॉय काय करतील याचा नेम नाही. याआधी डिलीव्हरी बॉयचे बरेच प्रताप समोर आले आहेत. आता असाच एक डिलीव्हरी बॉय चर्चेत आला आहे.

इंग्लंडच्या लिसेस्टरमधील (Leicester, England)  डिलीव्हरी बॉयने एक कांड केला आहे. त्याने ग्राहकाच्या घराजवळ पोहोचताच त्याच्याच घराच्या दरवाजाबाहेर असं काही केलं की पाहून ग्राहकालाही धक्का बसला. या ग्राहकाच्या दरवाजाजवळ कॅमेरा होता, या कॅमेऱ्यात या डिलीव्हरी बॉयचं संतापजनक कृत्य कैद झालं आणि ग्राहकाच्या रागाचा पारा चढला.

डिलीव्हरी बॉय दरवाजाजवळ आला त्याने डोअरबेल वाजवली. ग्राहक दरवाजा उघडणार त्याआधी डिलीव्हरी बॉयने संधी साधली. घरातील व्यक्ती हा बॉय काय करतो आहे हे सर्व कॅमेऱ्यात पाहत होती. त्याची पत्नी जेव्हा ऑर्डर रिसीव्ह करायला गेली तेव्हा डोअरबेल कॅमेऱ्यात तिला जे दिसलं ते पाहूनच ती शॉक झाली. इंटरकॉमवर तिने त्याला सुनावलं तसं तो लगेच थांबला. स्टोरीफूलच्या रिपोर्टनुसार ग्राहक दरवाजा उघडण्यापूर्वी बॉयने एका फूड पाकिटाला आपलं तोंड लावून उष्टावलं. आपल्या तोंडाने ते पाकिट खोललं आणि त्यातील पदार्थांची चव त्याने चाखली.

डिलीव्हरी बॉयजने ग्राहकांचे पदार्थ खाण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. यूएस फूड्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५०० पैकी २८ टक्के डिलीव्हरी बॉयजनी आपण कधीकधी फूड डिलीव्हरी ग्राहकांचे पदार्थ थोडे किंवा संपूर्ण फस्त केल्याचं कबूल केलं आहे. याचं कारण विचारता ५४ टक्के बॉयजनी पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या सुगंधामुळे ते स्वतःला रोखू शकत नाही असं म्हटलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके