हॉटेलमध्ये पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आपण वेटरला टीप देतो. एखादा पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला तरीही आपण त्याला टीप देतो. पण काही माणसं इतकी कंजुष असतात की त्यांच्या हातून १ रुपयाही सुटत नाही. अशी माणसं पिझ्झाचे पैसे देताच तिच मोठी गोष्ट मग डिलिव्हरी बॉयला टीप देणं तर दूरच.
मेहनीतच फळ गोड असतं अस म्हणतात. पण त्या मेहनतीवर थोडंस जास्त काही मिळालं तर ते आणखी गोड लागत. पण काहीजणांना बहुतेक हे मान्य नसतं. मग अशावेळी मेहनत करणारी व्यक्तीच एखादी शक्कल लढवते.
डेली मेलमध्ये दिलेल्या वृत्तानुसार एक डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन एका गृहस्थांच्या घरी डिलिव्हरीला गेला. तिथे दरवाज्यावरच बोर्ड लावलेला होता, टीप मिळणार नाही. पिझ्झाबॉक्समधलाच एक स्लाईस काढुन घ्यावा. डिलिव्हरी बॉयने तो बोर्ड वाचला आणि त्या पिझ्झा बॉक्समधला पिझ्झाचा एक स्लाईस काढुन घेतला. हा सर्व व्हिडिओ डोअरबेलला लावलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला.
अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया लिहिल्या. काहींनी तर असंही म्हटलं की तुम्ही टिप देऊ शकत नसाल तर ऑर्डर तरी कशाला करता?. हा व्हिडिओ गॅँग्युटेली व्हायरल्स या युजरने युट्यूबवर पोस्ट केला आहे.