Devar Bhabhi Wedding: झांसीच्या उल्दन भागात दीर आणि वहिनीला लग्नासाठी तयार करून त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. पचवारा गावात राहणारी सुधाचा पती शंकर अहिरवारचं तीन वर्षाआधी निधन झालं होतं. सुधाला तीन मुली आहेत. लहान असतानाच मुली बापाला पोरक्या झाल्या. मुलींच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची देखरेख शंकरचा लहान भाऊ रवि करत होता.
भाऊ रवि भावाच्या तिन्ही मुलींचं संगोपन करत असताना भावाच्या विधवा पत्नीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू होते. दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. त्याने वहिनीला तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण काही दिवसांआधी रविने वहिनीसोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर सुधाने पोलिसात लिखित तक्रार दिली.
पोलिसांना दोघांनाही बोलवून समजावून सांगितलं. तेव्हा कुठे रवि लग्नासाठी तयार झाला. पोलिसांनी कुटुंबियाची सहमती घेतली. नंतर पोलीस स्टेशन परिसरात सुधा आणि रविचं लग्न लावून दिलं. या अनोख्या लग्नाचे पोलीस साक्षीदार होते. सध्या गावात या लग्नाची चर्चा रंगली आहे. लोक दीर आणि वहिनीच्या लग्नाकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहेत.