हिरा खूपच मौल्यवान असून दागिन्यांच्या दुकानात हिरा घ्यायला गेल्यानंतर खूप पैसै मोजावे लागतात. सर्वसामान्य लोक हिरा घेण्याचा विचारही करू शकत नाहीत. पण अशा मौल्यवान वस्तू मोफत किंवा खोदकाम करताना मिळाल्या तर जणूकाही जॅकपॉटच लागतो. नागालँडच्या मौन जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. वांचिंग नावाच्या या गावात खोदकाम करत असताना मजूरांना हिरे सापडले आहेत.
गावातील लोकांना या प्रकाराची जशी माहिती मिळाली तसे ते लोक त्या ठिकाणी कुदळ आणि फावडा घेऊन पोहोचले. अजून हिरे मिळतील या भावनेने खोदायला सुरूवात केली. चमकणारी दगडं मिळालेली असून हा हिरा आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. म्यानमार बॉर्डरला लागून असलेले नागालँड वांचिंग गावातील ही घटना असून या खोदकामाचे फोटोज व्हायरल होत आहे. यामध्ये खोदकाम करून चमत्कारीक दगड मिळत आहेत.
काय सांगता! ५२ कोटी रूपयांची आहे ही हॅंडबॅग, इतकी किंमत का? याचं कारण वाचून कराल कौतुक...
रिपोर्ट्सनुसार गावातील लोक चमकणारे दगड घेऊन गेले आहेत. काही दिवसांपूर्वी अशी अफवा उडाली होती की, गावाच्या पर्वतचांवर हिऱ्यांची खाण आहे. त्यानंतर सगळ्यांनी खोदकाम करायला सुरूवात केली. सोम गावामधून समोर आलेल्या माहितीनुसार काही लोकांना अशी दगडं हिरे आहेत की नाहीत याबाबत माहिती मिळालेली नाही. या दगडांच्या गुणवत्तेची तपासणी केलेली नाही.
लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी
सोम या डिप्टी कमिश्नर थवलेसन यांनी सांगितले की, आता या पर्वतांमधून काही दगड मिळाले आहेत. सध्या या ठिकाणाची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. नागालँडच्या भूविज्ञान आणि उत्खनन विभागाचे लोक त्या ठिकाणी पोहोचले. करंट सायंसेसमध्ये इंडो-जर्मनमधील एका अभ्यासानुसार या ठिकाणी सुक्ष्म हिऱ्यांची खाण असू शकते.