जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काहीना काही अशा गोष्टी असतात ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच भूतान या आपल्या शेजारील देशाबाबत एक गोष्ट नेहमीच चर्चेत असते. येथील लोक पूर्वीपासून मानवी लिंगाची म्हणा Penis ची म्हणा पूजा करतात. ऐकायला हे जरा विचित्र वाटतं. पण तुम्ही जर तिथे गेलात तर येथील घरांवर तुम्हाला मानवी लिंगाच्या पेटिंग्स आणि ग्राफिटी दिसतील. या पेंटिंग्स बौद्ध पंरपरेच्या साक्षीदार मानल्या जातात.
या लिंगाच्या पेंटिंग्स वेगवेगळ्या भडक रंगांमध्येही केल्या जातात. काहींवर तर गिफ्टसारखी रेबिनही बघायला मिळते. पण या लिंगामध्ये एक कॉमन गोष्ट आहे. ती म्हणजे ही सर्वच लिंगे उभी आहेत.
इथे असे मानले जाते की, लिंगाच्या प्रतिमेने वाईट आत्मांना दूर राहतात आणि द्वेषाची भावनाही दूर राहते. त्यामुळेच अनेक घरांवर या पेंटिंग्स बघायला मिळतात.
तिबेटमधील दृक्पा कुंले नावाचा एक भिक्खु भूतानमध्ये आला होता. तो मद्यसेवन करत होता, महिलांसोबत संबंध ठेवत होता. म्हणजे तो कामुकतेच्या अधीन होता. या माध्यमातून तो धर्माचं तात्पर्य समजावत होता. त्याच्या या कारनाम्याच्या अनेक पौराणिक कथाही आहेत. त्याच्यामुळेच येथील भिंतींवर लिंगाच्या प्रतिमा तयार करण्यास सुरूवात झाली होती. कारण त्याला इन्फर्टिलिटीचा देव असंही म्हटलं जायचं.
दृक्पा कुंलेचे किस्से वादग्रस्त होते. तो म्हणायचा की, 'मडक्याच्या तळाला चांगली दारू असते आणि जीवनाचा खरा आनंद नाभिच्या खालीच मिळतो'.
हा भिक्खु अनेक दिवस मद्यसेवन करत कुमारीकांसोबत शारीरिक संबंध ठेवत असे. तो अपरंपरागत बौद्ध धर्माचा प्रचार करत होता. त्याने भक्तांना शिक्षा दिली होती की, मनुष्याने सांसारीक तृष्णेपासून दूर राहिलं पाहिजे आणि साधं जीवन जगलं पाहिजे. साध्या जीवनाशी त्याचा अर्थ होता की, आध्यात्माचा शोध आणि कामुकतेची उदारता. हा भिक्खु भक्तांना आशीर्वादाच्या रूपात त्यांच्यासोब संभोग करत होता.
भूतानच्या काही भागांमध्ये आजही एका प्रथेनुसार एका जत्रेत एक खास समुदाय अशा शिडीचा वापर करतात ज्याचा आकार लिंगासारखा असतो. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले आहे की, देव दोराच्या मदतीने या शिडीवरून खाली येऊन आरोग्यता आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.