आपण सर्वांनी बालपणी क्राफ्ट म्हणजेच हस्तकला करताना फेविकॉल किंवा गमचा वापर केला असेल. आजही आपण वस्तू चिकटवण्यासाठी फेविकॉल किंवा गम वापरतो. बाटलीत भरलेले पांढरे फेविकॉल वस्तू सहज चिकटवण्यात मदत करतो. पण ज्या बाटलीत तो भरलेला आहे त्या बाटलीला मात्र तो का चिकटत नाही याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
याचं अनोख्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी फेविकॉल किंवा गम म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. गम प्रत्यक्षात पॉलिमर्स नावाच्या केमिकल्स बनलेला असतो. पॉलिमर लांब पट्ट्या असतात ज्या एकतर चिकट किंवा ताणलेल्या असतात. अशा पॉलिमर्सचा वापर गम तयार करण्यासाठी केला जातो. यानंतर यामध्ये पाणी टाकले जाते. पाण्यामुळे गम लिक्विड स्टेटमध्ये येतो.
पाणी गममध्ये एक सॉल्व्हेंट म्हणून कार्य करतं. जे गमला कोरडे होऊ देत नाही. यामुळे फक्त गम द्रव अवस्थेत आहे. जेव्हा गम बाटलीतून बाहेर काढला जातो तेव्हा हवेच्या संपर्कामुळे गममधील पाण्याचं बाष्पीभवन होते आणि त्यात फक्त पॉलिमर राहतो. गमतून पाणी गायब झाल्यानंतर पॉलिमर पुन्हा चिकट आणि ताणलेला होतो. अशा प्रकारे गम वस्तू चिकटवण्यास मदत करतो.
गम बाटलीला का चिकटत नाही?
गमची बाटली बंद असते. बंद बाटलीत हवा पोहोचत नाही. यामुळे, पॉलिमरमध्ये असलेले पाणी सुकत नाही आणि गम द्रव अवस्थेत राहतो. तुमच्या लक्षात आले असेल की, गमची बाटली उघडी ठेवली तर त्यातील सर्व गम कसा सुकून जातो. कारण बाटलीचं झाकण उघडल्यावर गम हवेच्या संपर्कात येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"