श्रीमंत पती मिळावा ही बहुतेक महिलांची ईच्छा असते. त्यांना असं वाटतं की, जर पैसे असतील तर सगळ्या ईच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात. पण एका महिलेची वेगळीच अडचण आहे. तिला वाटतं की, कोट्याधीश पतीसोबत लग्न करून तिने तिचं नुकसान करून घेतलंय.
या महिलेने अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या श्रीमंत घरातील राहणीमानाची पोलखोल करतात. महिलेला पैशांची काहीच कमतरता नाही. तिचा पती लक्झरी लाईफ जगण्यासाठी पाण्यासारखा पैसे खर्च करतो. पण महिलेची वेदना वेगळीच आहे. तिने टिकटॉकवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने तिच्या जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले.
मुळची ब्रिटिश असलेल्या सउदीने 2020 मध्ये कोट्याधीश जमालसोबत लग्न केलं. दोघेही दुबईमध्ये एका आलिशान महालासारख्या घरात राहतात आणि आलिशान जीवन जगतात.
जमाल याला लक्झरी लाइफस्टाईल आवडते. त्याला वाटतं की, त्याच्या पत्नीनेही तसंच जगावं. बघायला तर वाटतं की, शाही जीवन आहे. पण सउदीच्या या सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ उडवली आहे.
टिकटॉकवर शेअर व्हिडिओमध्ये सउदीने आपल्या जीवनाबाबत अनेक रहस्य सांगितले आहेत. ती म्हणाली की, तिचं लग्न दुबईमधील एका कोट्याधीश जमालसोबत झालं. तेव्हा काही करार झाले. जे सामान्यपणे केले जात नाहीत.
हा एक मोठा करार होता. ज्यानुसार, मी कोणत्याही दुसऱ्या पुरूषासोबत मैत्री करू शकत नाही. पण जमालसाठी अशी कोणतीही अट नाही. संयुक्त अरब अमीरातीच्या कायद्यानुसार, त्याला दुसरं लग्न करण्याची परवानगी आहे. त्यासाठी केवळ सउदीची परवानगी घ्यावी लागेल.
दुसरी अडचण ही आहे की, सतत ट्रॅकिंग होतं. सउदीने सांगितलं की, तिच्या फोनमध्ये ट्रॅकर सतत सुरू असतं. म्हणजे तिचा पती तिला बघू शकतो. जमालच्या फोनमध्येही ते असतं.
सउदीनुसार, तसं तर हे सुरक्षेच्या दृष्टीने हे ठीक आहे. एक फायदा आणखीही आहे की, जमालला मला सतत फोन करून हे विचारावं लागत नाही की, मी कुठे आहे. त्याला ट्रॅक करता येतं.
सउदीने आपल्या खर्चांबाबत खुलासा केला केला. तिने सांगितलं की, जमाल दर आठवड्यात तिच्यावर लाखो रूपये खर्च करतो. सेफोरोमध्ये मेकअप आणि त्वचेच्या काळजीसाठी 3,500 डॉलर, नवीन गाड्यांसाठी 1.8 मिलियन डॉलर आणि एक रात्र बाहेर राहण्यासाठी 1,500 डॉलरचा समावेश आहे.
सउदीने सांगितलं की, मला सतत परफेक्ट दिसायचं असतं. ज्यासाठी पैसे खर्च होतात. मला व्यवहार चांगला ठेवायचो असतो. यामुळे नेहणीच अडचण होते. तुम्ही तुमच्या मनाने जगू शकत नाही.
तसेच ती म्हणाली की, कोट्याधीश पती असण्याचं आणखी एक नुकसान म्हणजे तुम्ही सतत पतीच्या आजूबाजूला राहू शकत नाही. याची तुम्हाला सवय लावावी लागते. तुम्हाला लक्झरी लाइफ फॉलो करावी लागते. याने तुम्ही इतर लोकांमध्ये राहू शकता. मला शांत आणि साधं जीवन पसंत आहे. पण ते तसं जगता येत नाही.