शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तीन महिन्यांत ५९ गुन्ह्यांची उकल

By admin | Published: July 11, 2015 2:21 AM

रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सुरू केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइनचा पोलिसांना फायदा होत असून, गेल्या तीन महिन्यांत या हेल्पलाइनमुळे ५९ छोट्या-मोठ्या गुन्ह्यांची

मुंबई : रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सुरू केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइनचा पोलिसांना फायदा होत असून, गेल्या तीन महिन्यांत या हेल्पलाइनमुळे ५९ छोट्या-मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबईबरोबरच राज्यातील अनेक भागांतून या हेल्पलाइनवर मदतीसाठी संपर्क साधण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी, प्रवासात घडलेल्या घटनेचे फोटो, व्हिडीओ पाठवता यावेत यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) ९८३३३१२२२२ हा निर्भया व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइन नंबर उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये छेडछाड, फोनवरून त्रास देणे, रेल्वेसंदर्भात विविध तक्रारी, बेपत्ता प्रवासी यांची माहिती देण्यात येते. ९ मार्च रोजी व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइन नंबर सुरू केल्यानंतर सुरुवातीलाच ५00पेक्षा अधिक मेसेज आले. या संदेशांचा आकडा सुरुवातीच्या १० दिवसांतच तब्बल १२ हजार ४0९ एवढा होता आणि त्यानंतर हा आकडा वाढतच गेला. कारण या क्रमांकावर देशभरातून संदेश येत असत. पण हा हेल्पलाइन नंबर मुंबईपुरताच असल्याचा प्रसार केल्यानंतर हे प्रमाण कमी झाले आणि त्यानुसार मदतीसाठी मॅसेज हेल्पलाइनवर येऊ लागले. गेल्या तीन महिन्यांत ५९ गुन्ह्यांची उकल या निर्भया व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइनद्वारे करण्यात आल्याचे जीआरपीचे जनसंपर्क अधिकारी रितेश आहेर यांनी सांगितले. मुंबई विभागापुरतीच जरी हेल्पलाइन मर्यादित असली तरी राज्यातील काही भागांतून या हेल्पलाइनवर मदतीसाठी विचारणा होते. त्यानुसार त्या-त्या भागातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा सोडवला जातो, असे अहेर यांनी सांगितले. अत्याचार, छेडछाड, ट्रेनच्या महिला डब्यातील हाणामारी यांसह अन्य गुन्ह्यांची उकल केली जाते, असे ते म्हणाले.