टोकियो : कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या तुमच्या कार्यक्षमतेवर स्मार्ट फोन प्रभाव पाडू शकतो. म्हणजेच, तुमचे लक्ष विचलित करू शकतो. स्मार्ट फोनची तुमच्याजवळची केवळ उपस्थितीही तुमच्या एकाग्रतेवर परिणाम करू शकते. एका संशोधनातून हे आढळून आले आहे, तुम्ही सातत्याने इंटरनेट वापरत नसलात, तरीही एकूणच तुमच्या कामावर स्मार्ट फोनचा परिणाम दिसून येतो. निरीक्षण आणि निर्णयातील विलंबास स्मार्ट फोन कसा कारणीभूत ठरू शकतो, हे सर्वांनाच आता चांगल्या प्रकारे माहीत झाले आहे. स्मार्ट फोनमध्ये तुम्ही इंटरनेटचा किती वापर करता, यावरही बरेच काही अवलंबून आहे. यापूर्वी अशा प्रकारे अभ्यास करण्यात आला नव्हता. नव्या संशोधनातून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, स्मार्ट फोनचे आपल्याभोवतालचे अस्तित्व आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेला मारक ठरू शकते.
स्मार्ट फोनमुळे लक्ष विचलित?
By admin | Published: January 10, 2017 1:12 AM