तुम्ही घटस्फोटाच्या अनेक घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. सेटलमेंट म्हणून पती किंवा पत्नी पैसे मागतात. पण एका व्यक्तीने आपली किडनी परत मागितली. डॉ. रिचर्ड बतिस्ताने पत्नीकडे आपली किडनी परत मागितली. जे त्यांनी तिला डोनेट केली होती. ते म्हणाले की, जर तिने किडनी परत दिली नाही तर 1.2 पाउंड द्यावे. ही घटना अमेरिकेतील आहे. ही केस तशी 2009 मधील आहे. डॉक्टरांनी पत्नी डॉनेलसोबत 1990 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना तीन मुले आहेत. पण पत्नी आजारी असल्याने अनेक समस्या होत्या.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 2001 मध्ये बतिस्ताने आपल्या पत्नीला किडनी डोनेट करण्याचा निर्णय घेतला. तिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या. ते म्हणाले की, त्यांची प्राथमिकता पत्नीचा जीव वाचवणं होतं आणि दुसरं लग्न सांभाळणं होतं. पण चार वर्षानंतर पत्नी डॉनेलने घटस्फोटाची केस दाखल केली. यामुळे बसिस्ता फार निराश झाले होते. त्यांनी पत्नीवर अफेअर असल्याचा आरोप केला होता. सोबतच म्हणाले की, एकतर तिने किडनी परत करावी किंवा पैसे द्यावे.
अशात मेडिकल एक्सपर्ट म्हणाले की, किडनी परत करणं शक्य नाही. एक्सपर्ट म्हणाले की, किडनी परत देण्यासाठी डॉनेलचं पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. यामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशात किडनी परत करता येणार नाही. ते असंही म्हणाले की, आता ती किडनी तिची झाली आहे कारण ती तिच्या शरीरात आहे.
पण नंतर डॉ. बतिस्ता यांची कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही. नासाउ काउंटी सुप्रीम कोर्टने त्यांची मागणी फेटाळली. कोर्टाने 10 पानांचा निकाल दिला. मॅट्रिमोनियल रेफरी जेफरी ग्रोब म्हणाले की, डॉक्टरांचं पैसे मागणं आणि किडनी परत मागणं कायद्यानुसार चुकीचं आहे. उलट तेच या केसमध्ये अडकू शकतात.