भारत सणांचा देश आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. भारतात कोणतंही फेस्टिवल उत्साहात साजरा करण्याची पद्धत आहे. मग तो गणेशोत्सव असो वा नवरात्री, गुडीपाडवा असो वा दिवाळी.दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक लोक घराची साफ-सफाई करून घर सजवण्याची तयारी सुरू केली असेल.
दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणरायाची पुजा केली जाते. घरात फराळाच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात घराच्या सजावटीकडे अनेकदा आपण दुर्लक्षं करतो. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही घराची सजावट करू शकता.
अशातच आज आम्ही तुम्हाला घर सजवण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. बाजारामध्ये अनेक विविध वस्तू आहेत. ज्यामुळे तुम्ही दिवाळीसाठी सजावट करू शकता. तसेच त्यांच्या मदतीने तुम्ही फार कमी वेळात सुंदर पद्धतीने घर सजवू शकता.
तोरण
दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर तुम्हाला सुंदर तोरणं लावलेली दिसतील. खरं तर दिवाळीच्या सजावटीची सुरुवात मुख्य दरवाजापासून होत असते. ज्यामध्ये तुम्ही वरती फुल आणि आंब्याची, अशोक वृक्षाची पानांनी तयार करण्यात आलेलं तोरण लावण्यात येतं. बाजारामध्ये खऱ्या फुलांच्या तोरणांसोबतच खोट्या फुलांची तोरणही असतात. याव्यतिरिक्त बाजारात तयार करण्यात आलेली फॅन्सी म्हणजेच, पेपर, फॅब्रिक, बिट्स आणि शंखांची तोरणं सहज उपलब्ध असतात.
रांगोळी
दिवाळीचं डेकोरेशन असावं आणि रांगोळीचा उल्लेख नाही तर कसं चालेल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढणं शुभं मानलं जातं. तुम्ही स्वतःच्या हाताने रांगोली काढू शकता. तसेच स्टिकर्स किंवा बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड रांगोळ्यांचा वापर करू शकता.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीसाठी खास घराला लाइटिंग केली जाते. तसेच आकाश कंदिलही लावला जातो. बाजारामध्ये विविध रंगांचे आणि वेगवेगळे आकाश कंदिल उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही घर सजवू शकता.
फ्लोटिंग कॅन्डल्स
सध्या पणत्यांसोबतच अनेक लोक बाजारात मिळणाऱ्या मेणाच्या पणत्या आणि जेल कॅन्डल्सनाही पसंती देतात. तुम्हीही यापैकी एखादा पर्याय निवडू शकता.