दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण... भारतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये घरात अनेक पदार्थांची रेलचेल असते. त्याशिवाय लाइट्स, दिवे, पणत्या, आकाश कंदिल यांसारख्या गोष्टींचा वापर करून आरास केली जाते. अशातच दिवाळी म्हटली की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, घराबाहेर किंवा अंगणात काढलेली रांगोळी. असं म्हटलं जातं की, दिवाळीमध्ये लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली जाते.
सध्या रांगोळीमध्येही वेगवेगळे ट्रेन्ड पाहायला मिळतात. आधी पांढऱ्या रांगोळीने नक्षी काढली जायची. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे रंग भरण्याचा ट्रेन्ड आला. आता तर बाजारात अनेक ट्रेन्डी रोंगोळ्यांचे प्रकार पाहायला मिळतात. एवढचं नाहीतर रांगोळ्यांचे स्टिकर्स आणि रेडिमेड रांगोळ्याही मिळतात.
आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट रांगोळी डिझाइन्सचे ऑप्शनस् सांगणार आहोत. दिवाळीमध्ये हे ऑप्शन्स रांगोळी काढण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
तुम्ही फुलांचा वापर करूनही सुंदर रांगोळी काढू शकता.