घरातील वयोवृद्ध लोक सांगतात की, घर स्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी नांदते. आता तर दिवाळीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशात घराच्या साफसफाईचं काम जोरात सुरू आहे. आता घरात सुख-शांती आणि संपत्ती हवी असेल तर लक्ष्मीला प्रसन्न करावं लागेल. त्यासाठी लक्ष्मीला घरात बोलवावं लागेल आणि लक्ष्मी घरात तेव्हाच येईल जेव्हा घर स्वच्छ असेल. दिवाळीला घरात कोणत्या वस्तू ठेवल्याने लक्ष्मी येत नाही, अशा काही ढोबळ मान्यता आहेत. त्यातीलच काही खालीलप्रमाणे सांगता येतील.
१) फुटलेला आरसा
(Image Credit : jagran.com)
सणासुदीला घरात लावण्यात आलेले आसरे चेक करा. ते फुटलेले किंवा तुटलेले असतील तर घरात ठेवू नका. घरात फुटलेला आरसा ठेवणं अशुभ मानलं जातं.
२) जुने दिवे वापरू नका
अनेकजण इतके दिवे विकत घेतात की, त्यांना पुढील वर्षापर्यंत ते पुरतात. जर तुमच्या घरातही गेल्यावर्षीचे दिवे असतील तर ते वापरू नका. खासकरून पुजेसाठी नवीन दिवे वापरावे असे मानले जाते.
३) फर्निचर
(Image Credit : hotel.com.au)
घरात जर तुटलेलं काही फर्निचर असेल तर त्यांची लगेच दुरूस्ती करून घ्या. जर फर्निचरही स्थिती फार जास्त खराब असेल तर ते घराबाहेर करा.
४) तुटलेली फोटो फ्रेम
(Image Credit ; crateandbarrel.com)
घरात किंवा देव्हाऱ्यात तुललेली फोटो फ्रेम किंवा फाटलेला फोटो असेल तर काढून टाका. कारण फाटलेला फोटो अशुभ मानला जातो.
५) घराचं मुख्य द्वार
(Image Credit : pinterest.com)
घरातील मुख्य द्वारातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे हा दरवाजा तुटलेला असू नये, असं मानलं जातं. जर दार खराब झालं असेल तर व्यवस्थित करा.