सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डिक्सोन पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन ५ जुलै रोजी शेअर करण्यात आला आहे. त्यात ऑपरेशन वॉटर गन जारी आहे असं कॅप्शन देण्यात आलं आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ गाजला आहे.
आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५० हजारापेक्षा जास्त लाइक्स आणि २० हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. या व्हिडीओ पोलिसांची एक तुकडी लहान मुलांवर वॉटर गन आणि पाण्याने भरलेले फुगे याने हल्ला करताना दिसत आहे.
व्हिडीओत पोलीस गाडीतून उतरुन वॉटर गनसह सज्ज होतात. त्यांच्याकडे पाण्याने भरलेले फुगे एका बादलीत असतात. जे जवान उचलून धावू लागतात. त्यानंतर पोलिसांचा मुकाबला लहान मुलांशी होतो. चिमुकले पोलिसांवर वॉटर बलून आणि गनने हल्ला करतात. पोलिसही त्यास प्रत्युत्तर देतात. संपूर्ण वातावरण मनोरंजनात्मक होते. पोलीस या लहान मुलांसोबत होळी खेळतात पण फक्त पाण्याने. हा व्हिडीओ जवळपास १ मिनिटांचा आहे. जो अनेकांना खूप आवडला आहे.