भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के लोक अजही शेतीवर अवलंबून आहेत. आज शेतीमध्ये ट्रॅक्टरचे मोठे योगदान आहे. अनेक महत्त्वाची कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे व टोकदार का असतात.
दोन्ही टायरचे उद्देश वेगळे - खरे तर, ट्रॅक्टरच्या पुढच्या आणि मागच्या टायरचा उद्देश वेग वेगळा असतो. यात ट्रॅक्टरचे हँडलिंग, त्याची पकड, बॅलेंस, तेलाचा वापर, आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ट्रॅक्टरच्या टायरची रचना करण्यात आली आहे.
...म्हणून छोटे असतात ट्रॅक्टरचे पुढचे टायर - पुढच्या छोट्या टायरच्या सहाय्याने ट्रॅक्टरची दिशा ठरवली जाते. हे टायर थेट स्टेअरिंगला जोडले गेलेले असतात. स्टेयरिंग फिरवल्यानंतरच ते फिरतात. या टायर्सची भूमिका केवळ एवढीच असते. याशिवाय हे टायर छोटे असल्याने यांना वळवणे सोपे जाते. म्हणजेच वळणावर जागा कमी असली तरीही ते फिरवले जाऊ शकतात. यासाठी पुढच्या बाजूला अधिक जागेची आवश्यकता लागत नाही. याशिवाय, लहान टायरमुळे इंजिनवरही कमी ताण येतो. यामुळे तेलही कमी लागते.
...म्हणून ट्रॅक्टरचे मागचे टायर असतात मोठे - चिख्खल अथवा मातीत कार आणि बाईकच्या तुलनेत ट्रॅक्टर सहजपणे काम करते. कमी ट्रॅक्शनमुळे कार किंवा दुचाकी चिखलात फसतात. पण मागचे टायर मोठे असल्याने ट्रॅक्टर सहजपणे निघून जाते. ट्रॅक्टरला मागच्या बाजूला मोठे टायर लावल्याने टायर चिखलात फसत नाही आणि चांगली पकड कायम ठेवते. याचबरोबर ट्रॅक्टरचे इंजिन पुढच्या बाजूला असते. यामुळे वजन बॅलेंस करण्यासाठीही मागच्या बाजूला मोठे टायर लावणे आवश्यक असते. याशिवाय मागच्या बाजूला दोन्ही मोठे टायर असल्याने ते लोड ओढतान ट्रॅक्टर पुढून बाजूने वर होऊ देत नाही.