शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या या रंगांचा अर्थ माहितीये? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 8:41 PM

Do you know : कधी तुम्ही टुथपेस्टच्या ट्युबकडे लक्ष दिलंय? असं असेल तर तुमचं लक्ष त्याच्या मागे असलेल्या कलर कोडवरही गेलं असेल. माहितीये ते काय असतं?

आपण रोज सकाळी सर्वप्रथम ब्रश करतो. ब्रश करताना तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर टूथपेस्टच्या खालच्या बाजूला कलर बार दिलेला असेल. वेगवेगळ्या टूथपेस्टच्या ट्युब्सवर निरनिराळ्या रंगाच्या पट्ट्या दिल्या जातात. या रंगाच्या पट्ट्या का दिल्या जातात याचा कधी विचार केला आहे का? या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ काय आहे?

तुम्ही सोशल मीडियावर टूथपेस्टच्या मागे लाल, हिरवा, काळा आणि निळा रंग टूथपेस्टमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांचा संदर्भ देत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक साइट्स पाहिल्या असतील. सोशल मीडियावर असे म्हटले जाते की पेस्टवरील हिरव्या चिन्हाचा अर्थ असा आहे की टूथपेस्ट पूर्णपणे नैसर्गिक आहे, निळ्या चिन्हाचा अर्थ आहे की त्यात नैसर्गिक घटक आणि औषधांचे मिश्रण आहे, लाल चिन्हाचा अर्थ आहे की त्यात नैसर्गिक घटक आणि रासायनिक घटक आहेत आणि ब्लॅक मार्क म्हणजे त्यात सर्व रासायनिक घटक असतात. पण या दाव्यात किती तथ्य आहे?

काय आहे अर्थ?ओरल हेल्थ केअर कंपनी कोलगेटने आपल्या वेबसाइटवर या दाव्यांचं खंडन केलं आहे आणि या बार कोडचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. कोलगेटने सांगितले की, टूथपेस्टवर बनवलेल्या या रंगीबेरंगी पट्ट्यांचा त्यात पडणाऱ्या घटकांशी काहीही संबंध नाही. कोलगेटचे म्हणणे आहे की या कलर कोडचे कारण टूथपेस्टच्या ट्युब्स बनवण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.

कोलगेटच्या म्हणण्यानुसार, टूथपेस्टचा रंग ट्यूब बनवणाऱ्या मशीनमध्ये बसवलेल्या लाईट सेन्सरला सूचित करतो की ट्यूब कोणत्या प्रकारची आणि आकाराची आहे. त्याच वेळी, कोणत्या ठिकाणाहून कापायची आहे आणि सीलही करायची आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके