Indian National Vegetable : निसर्गाने आपल्याला खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. ज्यात फळं आणि भाज्यांचाही समावेश आहे. काही लोक फळं कच्चे खातात तर भाज्यांना शिजवून मसाल्यांसोबत तयार केलं जातं. जगात असे बरेच लोक आहेत जे जेवणात बटाटे जास्तीत जास्त खातात. तर काही लोकांना हिरव्या भाज्या जास्त आवडतात. तुम्हीही अनेक भाज्या खात असाल, पण तुम्हाला आपल्या देशाची राष्ट्रीय भाजी कोणती आहे हे माहीत आहे का?
आपल्या आजूबाजूला वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या भाज्या असतात. ज्यांबाबत आपल्याला माहीत नसतं. अनेकदा यांची माहिती घेणं किंवा यावर चर्चा करणंही आपणं महत्वाचं मानत नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय झाड, राष्ट्रीय फूल, पशु-पक्षी आणि फळ याबाबत विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल, पण जर तुम्हाला राष्ट्रीय भाजीबाबत विचारलं तर तुम्हाला डोकं खाजवावं लागेल.
कोणती आहे राष्ट्रीय भाजी?
जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, बटाटे किंवा वांगी आपली राष्ट्रीय भाजी आहे. बरेच लोक कोव्हळं म्हणजे भोपळ्याच्या भाजीचं नाव ऐकताच नाकं मुरडतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, भोपळा आपल्या देशाची राष्ट्रीय भाजी आहे. काही लोकांना भोपळ्याची भाजी आवडते तर काही लोकांना नाही. भारतीय किचनमध्ये दररोज वेगवेगळ्या भाज्या बनतात कारण आयुर्वेदात यांना फार महत्व देण्यात आलं आहे. भोपळ्याच्या भाजीने कोलेस्ट्रॉल, डायबिटीय आणि हार्टसंबंधी आजारांमध्ये फायदा मिळतो.
भाजीही आहे फळ सुद्धा...
जगभरात भोपळा एकमेव असं फळं आहे ज्याला भाजीच्याही कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आणि फळाच्याही कॅटेगरीत. भारतीय भोपळा आणि परदेशातील भोपळ्यात फरक असतो. भारताशिवाय याचं उत्पादन अमेरिका, मेक्सिको आणि चीनमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जातं. 19व्या शतकात याचा शोध अमेरिकेत लागला होता. येथील मोठ्या भोपळ्यांचा वापर हॅलोविन नावाच्या उत्सवात आत्मांना घाबरवण्यासाठी करतात.