जगातल्या सगळ्यात लांब भिंतीचा विषय निघतो तेव्हा चीनमधील भींत सगळ्यांना आठवते. असं म्हटलं जातं की, चीनमधील ही भींत दोन हजार 700 वर्षाआधी बांधण्यात आली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा ही भींत तोडण्यात आली आणि पुन्हा बनवण्यात आली. ही भींत बघण्यासाठी जगभरातून लोक येतात. ही भींत हेबेई प्रांतातील शांहाईगुआनपासून सुरू होते आणि पण संपते कुठे हे फार कमी लोकांना माहीत असतं.
अशात आज आम्ही सांगणार आहोत की, ही शांहाईगुआनपासून सुरू होणारी भींत किनहुआंग्दाओ शहरात शंहाईजवळ संपते. इथे ही भींत बोहाई समुद्रात संपते. चीनच्या भिंतीच्या या भागाला लोओलोंगतु किंवा ओल्ड ड्रॅगन हेड नावाने ओळखलं जातं. असं मानलं जातं की, ज्या ठिकाणी भींत समुद्राला मिळते ती जागा बघून असं वाटतं की, ड्रॅगनचं तोंड समुद्रात बुडत आहे.
चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही भींत पसरली आहे. अशात लोक लाओलोंगतुमध्ये ही भींत बघण्यासठी येतात. त्यांना भिंतीसोबतच वेगवेगळे आर्ट वर्कही बघायला मिळतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही भींत 21 हजार 196 किलोमीटर लांब आहे. सुरूवातीला ही बनवण्यासाठी लाकूड आणि दगडांचा वापर करण्यात आला होता. नंतर यात विटांचाही वापर करण्यात आला.
चीनच्या भिंतीबाबत वेगवेगळी खोटे दावेही केले जातात. कुणी म्हणतं की, ही भींत चंद्रावरूनही दिसते. पण मुळात असं काही नाहीये. काही लोक दावा करतात की, अंतराळातून ही भींत दिसते. पण हेही खरं नाही. नासाने स्पष्ट केलं आहे की, असं काही नाहीये. तसे काही एक्सपर्ट सांगतात की, 3 किलोमीटर उंचीवर गेल्यावर ही भींत मनुष्यांच्या केसांइतकी बारीक दिसते. अशात अंतराळातून ती दिसणं शक्य नाही.