World Toe Wrestling Championships : जगभरात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण तुम्ही वर्ल्ड टो चॅम्पियनशिपबाबत ऐकलं का? जर ऐकलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला या अनोख्या खेळाबाबत सांगणार आहोत. फार कमी लोकांना या खेळाबाबत माहिती असेल. मात्र, हा खेळ गेल्या 53 वर्षापासून खेळला जातो. चला जाणून घेऊ विश्व टो कुस्ती चॅम्पियनशिप (World Toe Wrestling Championships) खेळ कुठे खेळला जातो. हा खेळ इंग्लंडमध्ये खूप पॉप्युलर आहे. चला जाणन घेऊ याचा इतिहास.
वर्ल्ड टो रेसलिंग चॅम्पियनशिपची जागा वेगवेगळी असते. पण याची सुरूवात 1970 च्या दशकात स्टॅफोर्डशायरच्या वेटन गावात झाली होती. या खेळाची सुरूवात ब्रिटनच्या एका प्रकारच्या खेळात आपली चॅम्पियनशिप ठेवण्याच्या इच्छेने झाली होती.
कसा खेळला जातो हा खेळ
वर्ल्ड टो रेसलिंग चॅम्पियनशिप 1976 मध्ये सुरू झाली होती. तेव्हा वर्ल्ड टो रेसलिंग स्पर्धा डर्बीशायरच्या वेटनमध्ये एका पबमध्ये सुरू झाली होती. स्थानिक लोकांनी विचार केला की, पायाच्या अंगठ्यांच्या कुस्तीची एक स्पर्धा ठेवणं चांगला विचार आहे. यात दोन लोक पायाच्या अंगठ्यांनी कुस्ती करतात.
आर्म रेसलिंग प्रमाणेच दोन लोक एकमेकांविरोधात लढतात. डॉक्टरांकडूनच अंगठ्याची टेस्ट केल्यानंतर तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.ही चॅम्पियनशिप आता स्टॅफोर्डशायर-डर्बीशायर सीमेवर एशबोर्नजवळ बेंटले ब्रुक इन आयोजित करतात. त्यांनी या खेळाला ऑलम्पिक खेळांमध्ये जागा मिळवण्यासाठी 1997 मध्ये अर्ज केला होता. पण तो स्वीकारला गेला नाही.