शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

दिवसभरात कित्येकदा वापरत असलेल्या 'OK' शब्दाची उत्पत्ती आणि फुल फॉर्म माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 1:01 PM

OK या शब्दाचा इतिहास जवळपास १८० वर्षे जुना आहे. अनेकजण असं मानतात की, या शब्दाचा शोध चुकीच्या उच्चारामुळे लागला होता.

OK हा इंग्रजी शब्द आता तर प्रत्येकाच्या बोलण्यात कितीतरी वेळा येत असेल याचा अंदाज नाही. अनेकांना तर ओके म्हणण्याची जणू सवयच लागलेली असते. अनेकजण हा शब्द लिहिताना किंवा बोलताना वापरतात, पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, या OK या अर्थ किंवा फूल फॉर्म काय आहे? चला आज आम्ही तुम्हाला तुम्ही कितीतरी वेळा वापरत असलेल्या शब्दाचा फूल फॉर्म सांगणार आहोत.

Prof. Allen Walker Read यांच्यानुसार, OK शब्दाचा प्रयोग सर्वात पहिल्यांदा १८३९ मध्ये करण्यात आला होता. आणि या शब्दाचा फुल फॉर्म ‘oll korrect’ असा आहे. इतकंच नाही तर OK शब्दाचा केवळ एकच नाही तर आणखीही फुल फॉर्म सांगण्यात आले आहेत.‘oll korrect’ शिवाय OK चा फुल फॉर्म Objection killed, Old Kinderhook, ग्रीक शब्द Olla kalla म्हणजे all good, O Kendall & Sons जे त्यांच्या प्रॉडक्ट्सवर Initials ‘OK’ करते थे, ‘Ober Kommando’-एक जर्मन General, जे documents साइन करण्यासाठी OK लिहित होते.

कशी झाली या शब्दाची उत्पत्ती?

OK या शब्दाचा इतिहास जवळपास १८० वर्षे जुना आहे. अनेकजण असं मानतात की, या शब्दाचा शोध चुकीच्या उच्चारामुळे लागला होता. पण OK शब्दाची उत्पत्ती व्यंग किंवा गंमत म्हणून झाली होती. १९व्या शतकात या शब्दाचा वापर व्यंग किंवा गंमत म्हणून केला जात होता. नंतर या शब्दाचा सर्वात आधी वापर १८३९ मध्ये ऑफिसमध्ये गंमतीच्या अंदाजात करण्यात आला होता. २ मार्च १८३९ मध्ये एका आर्टिकलमध्ये Oll Korrect या शब्दाचा वापर करण्यात आला.

Oll Korrect हा शब्द All Correct या शब्दाचा चुकीचा उच्चार व्यंगात्मक बोलताना केला जात होता. नंतर हा शब्द संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झाला. नंतर जगभरात याचा वापर केला जाऊ लागला. विकीपिडीयानुसार, OK हा शब्द Ole Kurreck चा शॉर्ट फॉर्म आहे. जो अमेरिकन इंग्रजीतून घेतला आहे. आता तर OK पण शॉर्ट फॉर्म K लोक वापरू लागले आहेत.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके