विमान प्रवास आपल्यापैकी अनेकांनी केला असेल किंवा नसेलही केला तरी लहानपणापासून अनेकांनी दूरुन का होईना विमान पाहिलेलं असतं. हे पाहत असताना तुम्ही याकडे कधी लक्ष दिलं नसेल की, काही अपवाद वगळता बहुतेक प्रवासी विमाने ही पांढऱ्या रंगांची असतात. मग ते कोणत्याही देशाचं असो. पण कधी विचार केलाय का, की प्रवासी विमानांना पांढराच रंग का असतो? खरंतर याच्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. ती काय हे जाणून घेऊया....
सूर्याचा प्रकाश होतो रिफ्लेक्ट
विमानाला पांढरा रंग ठेवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाचा चांगला रिफ्लेक्टर असतो. काळा किंवा इतर कोणत्या डार्क रंगांप्रमाणे पांढरा रंग हा सूर्याचा प्रकाश आणि त्याची गरमी शोषूण घेत नाही. जर विमानाचा रंग डार्क असेल तर याने सूर्य प्रकाश आणि त्याची गरमी शोषूण घेतली जाईल आणि याने विमानाच्या मशीनवर वाईट प्रभाव पडू शकतो.
हेही महत्त्वाचं
विमानाला पांढरा रंग असण्याचं आणखी एक कारण म्हणजे याने विमानाच्या बाहेरली भागास क्रॅंक असेल किंवा डॅमेज असेल तर सहजपणे दिसून पडतं. विमानाच्या बॉडीवर कोणत्याही प्रकारचा क्रॅक किंवा डॅमेजमुळे मोठा अजघात होऊ शकतो.
शोधणं सोपं होतं
जर विमानाचा अपघात झाला असेल आणि विमान कुठे जंगलात किंवा पाण्यात पडलं असेल तर पांढऱ्या रंगामुळे शोधणं सोपं होतं. रात्रीच्या अंधारात पांढऱ्या रंगाचं विमान सहज बघितलं जाऊ शकतं.
तेलगळती सहज कळते
जर विमानातील मशीनरी किंवा कोणत्याही भागातून तेलगळती होत असेल तर, तेव्हा पांढऱ्या रंगामुळे ती सहजपणे बघता येऊ शकते. त्यामुळे विमानांचा रंग हा पांढरा ठेवला जातो.