सोशल मीडियावर एका महिला डॉक्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण तिने असं काही केलं जे वाचून तुमच्या चेहऱ्यावर हसूही येईल आणि तुम्ही तिचं भरभरून कौतुकही कराल. जन्म दिल्यानंतर एका आईने जुळ्या मुलींना टाकून दिलं होतं. तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अविवाहित महिला डॉक्टर कोमल यादवने त्या मुलींना आपलसं केलं. हॉस्पिटल प्रबंधकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने काही ऐकलं नाही. सर्व औपचारिकता पूर्ण करून दोन्ही मुलींना घेऊन ती तिच्या गावी गेली. आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी तिचं कौतुक केलं आहे.
अवनीष शरण यांच्यानुसार, डॉक्टर कोमल यादव सध्या फर्रुखाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये तैनात आहे. सोशल मीडियावर ही बातमी येताच लोक डॉक्टर कोमल यादवची भरभरून कौतुक करत आहेत. ट्विटरसोबत इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा प्रेरणादायी कारनामा शेअर करण्यात आला आहे.
आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की, 'जन्म देताच जुळ्या मुलींना आईने टाकून दिलं. तर त्यांच्यावर उपचार करत असलेल्या अविवाहित महिला डॉक्टर कोमल यादव यांनी त्यांना जवळ केलं. डॉ. यादव या फर्रुखाबाद येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये तैनात आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, त्या लग्नही अशाच व्यक्तीसोबत करतील जो या मुलींना स्वीकारेल'.
आएएस अधिकाऱ्यांनी हे ट्विट ३१ डिसेंबरच्या २०२० च्या सायंकाळी शेअर केलं होतं. ज्याला आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ८०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा म्हणाले की, 'जन्म देणाऱ्या आईपेक्षा सांभाळ करणाऱ्या आईचं स्थान नेहमीच वर असतं'. डॉक्टर कोमल याचं मोठं उदाहरण आहेत. विश्वास बसत नाही अशीही आई आहे जिने आपल्या मुलींना जन्म देऊन मरायला सोडून दिलं. फारच लाजिरवाणी घटना, देव या मुलींना शक्ती देवो, आरोग्य देवो आणि समृद्धी देवो'.