पुन्हा पुन्हा नाकातून रक्त येण्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेलेल्या एका रूग्णामुळे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून लोकही हैराण झाले आहेत. टेस्टदरम्यान डॉक्टरांना दिसलं की, रूग्णाच्या नाकाच्या आता 150 जिवंत अळ्या आहेत. हा व्हिडीओ फ्लोरिडाचा असल्याचं सांगितलं जात आहे. यात एक डॉक्टर रूग्णाच्या नाकातून अळ्या काढताना दिसत आहे.
रिपोर्टनुसार, बरेच महिने कमजोरी जाणवल्यावर आणि नाकातून पुन्हा पुन्हा रक्त आल्यावर एक व्यक्ती फ्लोरिडा मेमोरिअल हॉस्पिलमध्ये पोहोचली. टेस्टदरम्यान डॉक्टरांना दिसलं की, रूग्णाच्या नाकात साधारण 150 अळ्या वळवळ करत आहेत. ज्यामुळे त्याला ही समस्या होत आहे.
फर्स्ट कोस्ट न्यूजने रूग्णाच्या हवाल्याने ही बातमी प्रकाशित केली. रूग्ण म्हणाला की, 'काही तासांमध्ये माझा चेहरा सुजला, माझे ओठ सुजले, मला बोलताना त्रास होत होता. माझ्या नाकातून रक्त वाहू लागलं होतं, थोड्या थोड्या वेळाने नाकातून रक्त येत होतं. पण मला बाथरूमला जाण्यासाठी उठताही येत नव्हतं'.
रूग्णाने सांगितलं की, जवळपास 30 वर्षाआधी न्यूरोब्लास्टोमा झाल्याने त्याची इम्यूनिटी फार कमजोर झाली होती. याच्या उपचारादरम्यान नाकातील एका कॅन्सर ट्यूमरला काढण्यात आलं होतं. बऱ्याच वर्षानी 2023 मध्ये पुन्हा नाकाची समस्या होऊ लागली. यामुळे तो डॉक्टरांकडे गेला.
डॉक्टर कार्लसन यांनी सांगितलं की, 'सुदैवाने रूग्णाने मला नाकातील रक्त जवळून बघण्यास सांगितलं. एका कॅमेराच्या माध्यमातून आम्ही नाकात पाहिलं. तेव्हाच सगळं दिसलं. नाक आणि सायनसमध्ये छिद्र होतं. यात अनेक अळ्या होत्या. ते म्हणाले की, या काही लहान अळ्या नव्हत्या. या अळ्या जेवण करतात तर मलही त्यागत असतील. ज्यामुळे विषारी वातावरण तयार होतं. यामुळे सूज येते.
डॉक्टर कार्लसन यांनी पुढे सांगितलं की, साइजच्या हिशेबाने अळ्या वेगवेगळ्या होत्या. रूग्ण फार अडचणीत होता. अळ्या त्याचे डोळे आणि मेंदुच्या फार जवळील भाग खात होत्या. डॉक्टरांनी रूग्णाला नाक साफ करण्यासाठी त्याला एक खास मलम दिला. आता त्याला वर्षातून तीन ते चार वेळा चेकअपसाठी जावं लागेल.