Shocking Incident : कॅमूरच्या चैनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे आरोग्य विभागाकडून एक मोठी चूक करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये एक रूग्ण पोहोचला होता, ज्याचं हाइड्रोसीलचं ऑपरेशन करायचं होतं. पण डॉक्टरांनी त्याऐवजी त्याची नसबंदी करून टाकली. जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा रूग्णाच्या परिवाराला धक्का बसला. ही घटना फारच गंभीर असून माजी चिकित्सा अधिकारी डॉ. राज नारायण प्रसाद आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तिकडे रूग्णाच्या परिवाराने पोलिसांना याची सूचना दिली असून न्यायाची मागणी केली आहे.
असं सांगण्यात आलं की, चैनपूरच्या जगरिया गावातील राम दहीन सिंह यादव यांचा मुलगा मनका यादवचा हाइड्रोसील खूप वाढला होता. ज्यावर उपचार करण्यासाठी आशा कार्यकर्त्यानी सल्ला दिला होता. जेणेकरून उपचार मोफत आणि चांगला व्हावा. तरूण आशा सेविकांच्या मदतीने चैनपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांना त्याचं हाइड्रोसीलचं ऑपरेशन करायचं होतं. पण फारच बेजबाबदारपणे त्यांनी त्याची नसबंदी केली. ज्यामुळे त्याचं भविष्य धोक्यात आलं.
डॉ. राज नारायण प्रसाद यांनी सांगितलं की, त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. रूग्णाला माहिती देऊनच त्याची नसबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केली जात असेल तर डॉक्टर आणि कर्मचारी यांना ते चांगलंच महागात पडणार आहे.
तरूण मनका यादव म्हणाला की, माझं हाइड्रोसिल वाढलं होतं. ज्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आला होता. पण त्यांनी हाइड्रोसिल ऐवजी माझी नसबंदी केली. आता माझं लग्न कसं होणार आणि मी कसा नवरदेव होणार? माझं नवरदेव होण्याचं स्वप्न डॉक्टरांनी मातीत मिसळलं. आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत.