पोट दुखत होतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला, ऑपरेशन करून काढली 187 नाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:28 PM2022-11-29T15:28:42+5:302022-11-29T15:31:22+5:30
रिपोर्टनुसार, 58 वर्षीय व्यक्तीचं नाव दयमप्पा हरिजन आहे. तो रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर शहरातील राहणारा आहे. शनिवारी दयमप्पाच्या पोटात दुखत होतं.
कर्नाटकमध्ये एका व्यक्तीच्या पोटातू 187 नाणी काढण्यात आली. ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोटदुखीच्या कारणासाठी आणि उलटी होत असल्याने गेली होती. डॉक्टरांनी त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या. एंडोस्कोपी केली. मग समजलं की, त्याच्या पोटात बरीच नाणी आहेत. ऑपरेशन करून त्याच्या पोटातून एक, दोन आणि पाच रूपयांची अनेक नाणी काढण्यात आली. एकूण462 रूपयांची 187 नाणी गिळली होती. डॉक्टरांनी सांगितलं की, या व्यक्तीला सिजोफ्रेनिया नावाचा आजार आहे.
रिपोर्टनुसार, 58 वर्षीय व्यक्तीचं नाव दयमप्पा हरिजन आहे. तो रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर शहरातील राहणारा आहे. शनिवारी दयमप्पाच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे त्याचा मुलगा रवि त्याला मेडिकल कॉजेल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. इथे डॉक्टरांनी लक्षणांच्या आधारावर एक्स-रे आणि एंडोस्कोपी केली. स्कॅनमधून समजून आलं की, त्याच्या पोटात 1.2 किलो वजनाची नाणी आहेत. यानंतर त्याचं ऑपरेशन करण्यात आलं.
डॉक्टरांनुसार, दयामप्पा सिजोफ्रेनियाने पीडित आहे आणि त्याला नाणी गिळण्याची सवय आहे. त्यांनी सांगितलं की, सिजोफ्रेनियाचे रूग्ण असामान्य रूपाने विचार करतात. रूग्णाने एकूण 187 नाणी गिळली होती. यात 5 रूपयांची 56 नाणी, दोन रूपयांची 51 नाणी आणि एक रूपयांची 80 नाणी होती.
दयमप्पाच्या मुलाने सांगितलं की, बाबा मानसिक आजारी होते. पण रोजची कामेही करत होते. त्यांनी कधीही याबाबत घरी सांगितलं नाही की, ते नाणी खातात. अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं होतं. पण तेव्हाही त्यांनी सांगितलं नाही की, त्यांनी नाणी गिळली. स्कॅनमधून समजलं की, त्यांनी 1.2 किलोची नाणी गिळली आहे.
मीडियासोबत बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, हे एक कठिण ऑपरेशन होतं. ऑपरेशन करणं अजिबात सोपं नव्हतं. रूग्णाचं पोट फुग्यासारखं फुगलं होतं. पोटात सगळीकडे नाणी होती. ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही सीआरच्या माध्यमातून नाणी शोधली. सगळीकडे नाणी होती. नंतर नाणी काढली. तीन डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलं.