सध्या जगभरात फीफा फुटबॉल वर्ल्ड कपची क्रेझ सुरू आहे. प्रत्येक फुटबॉल सामन्यातील 90 मिनिटे कोणालाही मिस करायची नाही. अनेक चाहते कतारला जाऊन स्टेडियममध्ये सामना पाहण्यास प्राधान्य देत आहेत, तर काही जण टीव्ही स्क्रीनला चिकटून बसलेले पाहायला मिळत आहेत. असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एक असा फुटबॉल चाहता समोर आला आहे ज्याला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले.
रुग्णालयात ऑपरेशन सुरू असताना एक रुग्ण फीफा वर्ल्ड कप पाहताना दिसत आहे. भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही या रुग्णाने लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या फॉलोअर्सना विचारले की हा माणूस कोणत्याही प्रकारच्या ट्रॉफीसाठी पात्र आहे का? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा फोटो पोलिश शहरातील किल्समधील हॉस्पिटलने काढला असून आता शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी नोट्स फ्रॉम पोलंडच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट शेअर केलं आहे. 'पोलंडमधील एका रुग्णाने ऑपरेशन थिएटरमध्ये असूनही स्पाइनल एनेस्थेसिया असताना वर्ल्ड कप पाहिला. कील्सचे हॉस्पिटल SP ZOZ MSWiA ने हा फोटो शेअर केला आहे. ट्विटनुसार, पोलंडमधील किल्स येथील रूग्णावर उपचार करणार्या रूग्णालयात ही घटना घडली आहे. त्या व्यक्तीवर 25 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णाने डॉक्टरांना विचारले की ते सर्जरीदरम्यान तो वेल्स आणि इराणमधील फुटबॉल सामना पाहू शकतात का? त्याची विनंती मान्य करण्यात आली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेलिव्हिजन सेट आणण्यात आला आणि त्या रुग्णाला स्पाइनल एनेस्थेसिया देण्यात आला. स्पाइनल एनेस्थेसियाचा उपयोग रुग्ण जागा असताना शरीर कंबरेपासून खाली सुन्न करण्यासाठी केला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.