शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला खायला दिले 1 कोटी; जेव्हा समजलं तेव्हा ढसाढसा रडली मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 3:18 PM

एका महिलेने आपल्या कुत्र्याला एक, दोन हजार नाही तर तब्बल 1 कोटी रुपये खायला दिल्याची घटना समोर आली आहे. 

आपल्यापैकी अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. घरात राहून हे प्राणी कुटुंबातील सदस्यासारखे बनतात. विशेषत: जर आपण कुत्र्यांबद्दल बोललो तर ते त्यांचे मालकाच्या कुटुंबाशी चांगलं जुळतं. यामुळेच मालकही त्यांच्यावर खूप प्रेम करतात. असंच प्रेम एका महिलेला महागात पडलं आहे. एका महिलेने आपल्या कुत्र्याला एक, दोन हजार नाही तर तब्बल 1 कोटी रुपये खायला दिल्याची घटना समोर आली आहे. 

ड्रॅव्हलो नावाच्या युजरने ही गोष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर केली आहे. तिने सांगितले की तिच्याकडे एक काळ्या रंगाचा लेब्राडोर आहे, जो फक्त गोंडसच नाही तर खूप शिस्तप्रिय देखील आहे. 3 आठवड्यांपूर्वी तिने तिच्या कुत्र्याचा चिप्स खाताना व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये मालकिणीच्या हातात हृदयाच्या आकाराचा चिप्स होता, जो कुत्रा खाण्याची वाट पाहत होता. 

महिलेने आदेश देताच कुत्र्याने पटकन चिप्स खाल्ला. मात्र या चिप्सची किंमत तब्बल एक कोटी रुपये होते. महिला खूप खूश होती पण तिला जेव्हा सत्य समजलं तेव्हा ती ढसाढसा रडायला लागली. पोस्टमध्ये, ड्रॅव्हलो म्हणाली की, वॉकर्स क्रिस्पकडून हार्ट शेप क्रिस्प हंटिग स्पर्धा सुरू होती. यामध्ये वॉकर्स क्रिस्प खाणाऱ्यांना परफेक्ट ह्रदयाच्या आकाराचे क्रिस्प शोधायचे होते. 

एका पॅनेल हे सर्व जज करत होतं आणि परफेक्ट हृदयाच्या आकाराच्या क्रिस्पला £100,000 म्हणजेच 1 कोटी रुपयांहून अधिक बक्षीस मिळेल. युजरचा चिप्स अगदी हृदयाच्या आकाराच्या असल्याने, स्पर्धेबद्दल जाणून घेतल्याने तिला खूप दुःख झाले आणि पश्चात्ताप झाला. त्याचवेळी लोक तिचे सांत्वन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdogकुत्रा