शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रे भुंकतात? एवढी एकच ट्रिक करून पाहा; ना मागे लागतील, ना भुंकतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:35 PM

जे लोक रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करतात, त्यांना कधी ना कधी, गाडीवर कुत्रे भुंकल्याचा आणि मागे लागण्याचा अनुभव नक्कीच आला असेल.

दुचाकींच्या बाबतीत भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाजपेठेपैकी एक आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक दुचाकीने प्रवास करतात. जसजशी लोकांची धावपळ वाढत आहे, जीवन गतिमान होत आहे, तस-तसे दिवस आणि रात्र यांतील अंतरही कमी होत चालले आहे. आता मोठ्या प्रमाणावर लोक रात्रीच्या वेळीही प्रवास करताना दिसतात. अशात जे लोक रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करतात, त्यांना कधी ना कधी, गाडीवर कुत्रे भुंकल्याचा आणि मागे लागण्याचा अनुभव नक्कीच आला असेल. असे अनेवेळा होते.  

रात्रीच्या वेळी बाईकवर का भुंकतात कुत्रे? -मात्र असे होऊ नये असे आपल्याला नक्कीच वाटत असेल. एवढेच नाही, तर कुत्रे गाडीवर का भूंकतात? ते गाडीमागे का लागतात? हा टाळण्याचा उपाय काय, असे प्रश्न अनेकांच्या मनात आलेले असू शकतात. खरे, तर कुत्रे भुंकण्याची अनेक कारणं असू शकतात. खरे तर, आपण जेव्हा रात्रीच्या वेळी बाईक अथवा स्कूटरवरून कुत्र्यांच्या बाजूने जातो, तेव्हा आपल्या वेगामुळे ते भडकतात आणि भुंकत पाठलाग करतात. मात्र, असे होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

वापरा ही ट्रिक -रात्रीच्या वेळी आपल्या बाईकवर कुत्र्यांनी भुंकूनये आणि बाईक मागे लागू नये, असे आपल्याला वाटत असेल तर, त्यांच्याजवळून जाताना बाईकचा वेग कमी करा. आपल्या लक्षात येईल, की असे केल्याने कुत्रे आपल्यावर भुंकत नाहीत. तथापी, तुमची बाईक कमी वेगात असतानाही कुत्रे तुमच्यावर चालून आले तरी घाबरून गाडी वेगात चालवू नका कारण यामुळे अपघातही होऊ शकतो.

अशा स्थितीत, बाईक थांबवा. कुत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करा.  यानंतर हळू हळू बाईक पुढे न्या आणि तेथून निघून जा. सर्वसाधारणपणे असे केल्याने कुत्रे मागे फिरतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbikeबाईकdogकुत्रा