जगभरात आपल्या सुंदरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रीसमध्ये गाढवांसाठी खास कायदे तयार करण्यात आले आहेत. येथील 'आयलंड ऑफ सेंटोरिनी' नावाने हे आयलंड ओळखलं जात असून इथे अनेक बॉलिवूड सिनेमांचे शूटिंग होत असतं. इथेच गाढवांसाठी कायदे तयार करण्यात आले आहेत.
ग्रीसमधील खाद्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने एक रेग्युलेशन पास केलं आहे. यात गाढवांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. काम करण्याच्या तासांपासून ते त्यांच्यावर किती वजन लादलं जावं, यावर विचार करण्यात आला आहे. यासाठी प्राण्यांसंबंधी काम करणाऱ्या अनेक संस्था एकत्र आल्या आहेत. तसेच यासाठी ऑनलाइन पिटिशनही साईन करण्यात आली आहे.
या आयलंडवर दरवर्षी अनेक पर्यटक फिरायला येतात. फार कमी पर्यटक इथे आल्यावर पायी चालण्याचा विचार करतात. त्यामुळे लोक इथे गाढव बुक करतात आणि त्यावर फिरतात. परिसरातील लोकांचं म्हणनं आहे की, इथे जास्त वजन असलेले फार जास्त येतात, या लोकांना घेऊन जातांना त्यांच्या गाढवांना चांगलाच त्रास होतो.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या रेग्युलेशनमध्ये लिहिले गेले आहे की, आता या गाढवांवर १०० किलोपेक्षा जास्त सामान लादलं जाणार नाही. गाढव लागोपाठ अनेक तास काम करणार नाही. या आयलंडवर पर्यटकांची संख्या जास्त असल्याने गाढवांची स्थिती फार वाईट होते. ते अनेक तास सतत काम करत असतात.