पोटदुखी एक कॉमन समस्या आहे. अनेकदा चुकीचं काही खाल्ल्यामुळे पोटात दुखतं. काही लोक यासाठी औषध घेतात तर काही लोक समस्या जास्त असेल तर डॉक्टरांकडे जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक मुलगा पोटात दुखत असल्याचे डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याचा रिपोर्ट पाहिला तर ते हैराण झाले. डॉक्टरांना दिसलं की, त्याच्या पोटात एक स्टीलचा ग्लास आहे.
रिपोर्टनुसार, ही घटना बिहारच्या बेतियामधील आहे. नशेत असलेल्या एका 22 वर्षीय मुलाच्या पोटात काही दिवसांआधी वेदना होत होती. इतकंच नाही तर त्याच्या मलद्वारातून रक्तही येत होतं. घटनेची गंभीरता बघता त्याला लगेच पटणा येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी जेव्हा त्याचं चेकअप केलं आणि रिपोर्ट पाहिले तर त्याच्या पोटात एक 14 सेमी लांब ग्लास दिसला. हा ग्लास शरीराच्या आत अडकला होता. ज्यामुळे त्याच्या मलद्वारातून रक्त येत होतं.
सर्जरी करणारे डॉक्टर इंद्र शेखर कुमार यांनी सांगितलं की, सर्जरी साधारण 11 डॉक्टरांच्या टीमने केलं आणि यशस्वीपणे स्टिलचा ग्लास तरूणाच्या पोटातून बाहेर काढला. तरूणाच्या पोटातून ग्लास काढण्यासाठी कोलोस्टॉमी करण्यात आली. ही एक अशी सर्जरी असते ज्यात आतडीला एक होल केलं जातं आणि एक बॅग फिट केली जाते.
तरूणाला काही दिवसात सुट्टी दिली जाई आणि जानेवारीमध्ये त्याची कोलोस्टॉमी काढली जाईल. डॉक्टरांनी दावा केला की, जेव्हा तरूण नशेत होता तेव्हा त्याच्या शरीरात ग्लास टाकण्यात आला असेल. त्यामुळेच त्याला काही आठवण नव्हती.
काही दिवसांआधी घडली होती अशी घटना
मध्यप्रदेशच्या भींडमध्येही एका व्यक्तीच्या पोटाखाली बऱ्याच दिवसांपासून दुखत होतं. जेव्हा हे दुखणं वाढलं तेव्हा तो जिल्हा हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याची ब्लड टेस्ट केली, अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे काढला. जेव्हा पाहिला तर डॉक्टरही हैराण झाले. रिपोर्टमधून समोर आलं होतं की, व्यक्तीच्या यूरिनरी ब्लॅडरमध्ये खिळा अडकला आहे. ज्यामुळे त्याला वेदना होत होती. एक वर्षापासून हा खिळा त्याच्या ब्लॅडरमध्ये अडकला होता.