अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एका लिलावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इथे टेपने चिटकवलेल्या एका केळ्याचा लिलाव करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे केळ खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये मोठी स्पर्धा रंगली होती. यासाठी ते कितीही किंमत देण्यास तयार होते. शेवटी या केळ्यासाठी ५.२ मिलियन डॉलरची बोली लावण्यात आली. म्हणजे लोक या केळ्यासाठी ४२ कोटी रूपयेही देण्यास तयार होते. हे सगळं ठीक...पण या केळ्यात असं काय आहे की, लोक इतकी किंमत देण्यास तयार आहेत? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
मुळात हा लिलाल केवळ एका केळ्याचा नव्हता. तर एका फेमस आर्टवर्कचा होता. आर्टवर्कच्या नावाखाली भिंतीवर टेपने चिटकवलेलं एक केळ होतं. हे डक्ट-टेपने चिटकवलेलं केळ मॉरिजियो कॅटेलनचं 'कॉमेडिअन' नावाचं आर्टवर्क आहे. ही एक प्रसिद्ध कलाकृती मानली गेली आहे आणि न्यूयॉर्कच्या लिलावात ही ६.२ मिलियन अमेरिकन डॉलरला विकण्यात आली. म्हणजे भारतीय करन्सीनुसार, तब्बल ५२ कोटी रूपये.
क्रिप्टो उद्योगपती जस्टिन सन यांनी २०१९ मध्ये व्हायरल झालेल्या कलाकृतीच्या तीनपैकी एका एडिशनची खरेदी केली. लिलावात ही कलाकृती १ ते १.५ मिलियन अमेरिकन डॉलरला विकली जाईल, असा अंदाज लावण्यात आला होता.
कॉमेडिअन नावाच्या २०१९ मधील या कलाकृतीचे तीन एडिशन आहेत. यातीलच एकाचा लिलाव बुधवारी रात्री न्यूयॉर्कच्या सोथबीमध्ये करण्यात आला. या लिलावात कलाकृतीची बोली जेव्हा ५.२ मिलियनपर्यंत पोहोचली तेव्हा लिलावकर्ते ओलिवर बार्कर म्हणाले की, मी कधीही विचार केला नव्हता की, 'एका केळ्यासाठी ५ मिलियन डॉलर' म्हणेल.
सोथबीमध्ये प्रदर्शित केळ कथितपणे त्या दिवशी ३५ सेंटला खरेदी करण्यात आलं होतं. लिलावात जेन हुआ यांनी चीनचे क्रिप्टो उद्योगपती जस्टिन सन यांच्याकडून शेवटची बोली लावली. ते या कलाकृतीसाठी ५.२ मिलियन अमेरिकन डॉलर देतील. प्रिमिअमसहीत ते ६.२ मिलियन अमेरिकन डॉलर देतील. याबदल्यात सन यांना एक केळ आणि डक्ट-टेपचा रोल मिळेल. सोबतच एक प्रमाणपत्र आणि एक गाइड बुकही दिलं जाईल.