मानिला - महाकाय सागराच्या उदरात अनेक आश्चर्ये, मौल्यवान रत्ने दडलेली आहेत. बऱ्याचदा अगदी अनपेक्षितपणे अशी रत्ने मानवाच्या हाती लागतात. फिलिपिन्समधील पालवन बेटावर राहणाऱ्या एका मच्छिमाराच्या हाती असाच एक विचित्र दगड लागला आणि त्या दगडाने या मच्छिमाराला अब्जाधीश बनवले. त्याचे झाले असे की, हा मच्छिमार मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेला होता. तो मासे पकडत असताना अचानक वादळ आले. त्या वादळात तो अडकला. वादळाचा जोर वाढल्याने त्याने जीव वाचवण्यासाठी एका दगडाचा आधार घेतला. त्या दगडाच्या आधारावर जीव मुठीत धरून तो वादळ शमण्याची वाट पाहू लागला. अखेर वादळ थांबले आणि त्या मच्छिमाराचाही जीव वाचला. ज्या दगडामुळा आपला जीव वाचला त्याला भाग्यवान समजून तो मच्छिमार तो दगड आपल्या घरी घेऊन गेला. सुमारे दहा वर्षे हा दगड त्या मच्छिमाराने आपल्या घरी ठेवला. मात्र एके दिवशी अचानक त्याच्या घराला आग लागली. त्यानंतर एका टुरिस्ट ऑफिसर तेथे आला असता त्याची नजर त्या दगडावर पडली. त्याने या दगडाविषयी मच्छिमाराकडे विचारणा केली. तेव्हा मच्छिमाराने सारी हकीकत सांगितली. मच्छिमाराचे म्हणणे ऐकल्यानंतर हा साधासुधा दगड नसून एक विशाल मोती असल्याचे त्या टुरिस्ट ऑफिसरने सांगितले. ते ऐकताच मच्छिमाराला आश्चर्याचा धक्का बसला. हा मोती विक्रीसाठी ठेवला असता त्याला तब्बल 6 अब्ज 53 कोटी इतकी प्रचंड किंमत मिळाली. आणि हा गरीब मच्छिमार अब्जाधीश झाला.
दहा वर्षे दगड म्हणून घरात ठेवली समुद्रात सापडलेली वस्तू, वस्तुस्थिती समजल्यावर बसला 440 व्होल्टचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 5:47 PM