पती-पत्नींमधील नातं आणि घटस्फोट अनेकदा चर्चेत येत असतात. अनेकदा नात्यात चिढ आणि द्वेष इतका वाढतो की, कोर्टरूममध्येही अनेकांची हालत खराब होऊन जाते. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. पती-पत्नी घटस्फोटासाठी कोर्टात पोहोचले होते. दरम्यान पतीने न्यायाधिशांकडे मागणी केली की, त्याला जपानी तलवार देण्यात यावी, जेणेकरून तो तलवारबाजी करून त्याच्या पत्नीला ट्रायलमध्ये हरवेल.
डेविड ऑस्ट्रॉम नावाच्या या व्यक्तीचं वय ४० वर्षे आहे आणि तो अमेरिकेतील कॅनसास शहरात राहतो. शेल्बी काउंटीच्या कोर्टात त्याच्या आणि ब्रिगेच ऑस्ट्रॉम(३४) यांच्यात घटस्फोटाची सुनावणी सुरू होती. डेविड यावेळी इतका संतापलेला होता की, त्याने न्यायाधीशाकडे मागणी केली की, त्याला जपानी तलावर दिली जावी.
Des Moines Register च्या रिपोर्टनुसार, कोर्टात डेविडने दावा केला की, त्याच्या पत्नीने त्याला कायदेशीर स्वरूपात पूर्णपणे बर्बाद केलंय. एका पतीचा इतका राग आणि हताशपणा पाहून कोर्टही हैराण झालं होतं. डेविड कोर्टात म्हणाला की, 'अजूनही अमेरिकेत युद्धाच्या माध्यमातून केसचा निकाल लावण्याची प्रथा पूर्णपणे बंद झालेली नाहीये'.
डेविडने त्याची मागणी योग्य असल्याचं सांगत ब्रिटीश कोर्टाचा उल्लेखही केला. १८१८ मध्ये 'ट्रायल बाय कॉम्बॅट'चा उपयोग केला गेला होता. पण हे अशक्य आहे की, दुसऱ्या देशातील कोर्ट हे मान्य करतील. युद्धाने केसचा निकाल लावण्याचा अधिकार ब्रिटीश सामान्य कायद्यातून मिळाला आहे. हा संयुक्त राज्य अमेरिकेतील कायदे प्रणालीच्या आधारे काम करतो.