जालंधर : विमानातून प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते; पण एक असेही गाव आहे जिथे प्रत्येक घरात एक विमान आहे. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; मात्र जालंधरच्या लांबडा गावात गेल्यावर याचा अनुभव घेता येईल. अगदी प्रत्येक घराच्या छतावर किंवा अन्यत्र एक विमान हमखास दिसेल. आता ते कसे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर आहे की, प्रत्येक घरावर विमानाच्या आकाराचे बांधकाम करण्यात आले आहे. मग ती पाण्याची टाकी असो वा अन्य काही बांधकाम; पण येथे घरोघरी विमान दिसणारच. एव्हाना विमानाचे गाव म्हणून या गावाची ओळख झाली आहे. येथील रहिवासी संतोष सिंह यांनी तर आपल्या घरावर एवढे मोठे विमान तयार केले आहे की, ते दोन कि.मी. अंतरावरून दिसते. हे गाव म्हणजे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. पंजाबच्या जालंधर, कपूरथला, होशियारपूर आणि दोआबा या भागात अनेक गावांच्या घरांवर, पाण्याच्या टाकीवर विमान दिसून येते.
प्रत्येक घरात आहे एक विमान
By admin | Published: July 04, 2017 12:56 AM