सामान्यपणे कोणत्याही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रेंड कमांडो किंवा आर्मीची असते. पण जगात एक असाही देश आहे जेथील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाची सुरक्षा गरूड आणि घुबड या पक्षी करतात. यांच्या तैनातीचं एक खास कारण आहे.
रशियामध्ये राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आणि त्याच्या आजूबाजूला असलेला मुख्य इमारतींच्या सुरक्षेसाठी देशाच्या सुरक्षा विभागाने गरूड आणि घुबडाची एक टीम तयार केली आहे. शिकारी पक्षांची ही टीम १९८४ मध्ये तयार करण्यात आली होती. ज्यात सध्या १० पेक्षा जास्त गरूड आणि घुबडं आहेत. या पक्षांना सुरक्षेच्या दृष्टीने खासप्रकारचं ट्रेनिंग देण्यात आलं आहे.
(All Image Credit : Social Media)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कावळ्यांपासून राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थानाची सुरक्षा करण्यासाठी या गरूडांना आणि घुबडांना तैनात करण्यात आलं आहे. कावळ्यांच्या मलमूत्रामुळे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या इमारतींचं नुकसान होत होतं. त्यामुळे त्यांना दूर पळवण्यासाठी यांना तैनात करण्यात आलं आहे. हे पक्षी संघीय गार्ड सेवेचा भाग आहेत.
या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात या पक्ष्यांच्या टीममध्ये २० वर्षांची एक मादा गरूड 'अल्फा' आणि 'फायल्या' नावाचं घुबड आहे. यांची खासियत ही आहे की, यांनी राष्ट्रपती भवनाच्या आजूबाजूला कावळ्यांचा आवाज ऐकला किंवा कावळे उडताना दिसले तर ते त्यांच्यावर तुटून पडतात आणि कावळ्यांना दूर पळवतात किंवा त्यांचा खात्मा करतात.
क्रेमलिन आणि त्याच्या आजूबाजूच्या इमारतींची देखरेख करणारा पावेल माल्कोव यांने सांगितलं की, सोव्हियत संघाच्या सुरूवातीच्या काळात या इमारतींच्या सुरक्षेसाठी कावळ्यांना मारणारे गार्ड ठेवले होते. सोबतच त्यांना घाबरवण्यासाठी शिकारी पक्ष्यांच्या रेकॉर्डेड आवाजांचाही वापर करण्यात आला होता, पण या सर्व फार फायदेशीर ठरल्या नाहीत.
या पक्ष्यांना आता एक खासप्रकारचं ट्रेनिंग दिलं जात आहे. जेणेकरून ते कोणतही छोटं ड्रोन जर या इमारतीजवळ दिसलं तर त्यालाही पाडू शकतील.