लिथुआनियामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डॉक्टरांनी एका माणसाच्या पोटातून एक किलोपेक्षा जास्त खिळे-बोल्ट-स्क्रू आणि चाकू काढलाय. त्या व्यक्तीच्या पोटातील हे सर्व सामान पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. दारुचे व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तीने धातूच्या वस्तू खाण्यास सुरुवात केली. पण, काही काळानंतर तीव्र वेदना झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.
डेली मेलच्या वृत्तानुसार, संबंधित व्यक्तीने आपली ओळख उघड करण्यास नकार दिला आहे. पोटात तीव्र वेदना झाल्यानंतर रुग्णालयात गेलेल्या व्यक्तीचा एक्स-रे केल्यानंतर डॉक्टरांनाही मोठा धक्का बसला. त्याच्या पोटात डॉक्टरांना अनेक धातूचे तुकडे दिसले. चार-चार इंच लांबीचे खिळे, नट, बोल्ट, स्क्रू आणि एक चाकू त्याच्या पोटात दिसला. त्या व्यक्तीच्या पोटात धातूच्या वस्तू पाहून डॉक्टरही हैराण झाले.
मोठ्या ऑपरेशननंतर वाचला जीवडॉक्टरांनी तीन तासांच्या ऑपरेशननंतर त्या व्यक्तीच्या पोटातून धातूच्या वस्तू यशस्वीरित्या काढल्या. सर्जन सरुनास डेलेडेना यांनी सांगितल्यानुसार, त्या व्यक्तीला दारुचे व्यसन होते. हे व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तीने धातूच्या वस्तू खाण्यास सुरुवात केली. अनेक दिवस धातूच्या वस्तू खाल्यानंतर त्याला वेदना सुरू झाल्या. या वेदना वाढल्यानंतर त्याने रुग्णालय गाठले. ऑपरेशनमध्ये त्या व्यक्तीच्या पोटात एक किलोपेक्षा जास्त धातूच्या वस्तू आढळल्या. दरम्यान, अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही धातूच्या वस्तू पोटात सापडल्याच्या विविध ठिकाणी अनेक घटना घडल्या आहेत.