लॉकडाऊनच्या काळात नोकरी सोडून वेगळ्या मार्गाने यश प्राप्त केल्याच्या अनेक तरूणांच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. कारण लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. तर कोणी नाईलाजाने ताण सहन न झाल्याने नोकरीला राम राम ठोकला. आज आम्ही तुम्हाला नोकरी सोडण्याच्या निर्णयानंतर तुफान नफा मिळवणाऱ्या एका तरूणाबद्दल सांगणार आहोत. केरळचा रहिवासी असलेल हा तरूण गेल्या १० वर्षांपासून कतारमध्ये नोकरी करत होता.
या तरूणाचा पगार एक लाख रूपये होता. पण त्यासाठी कुटुंबापासून दूर परदेशात राहावं लागत होतं. आई वडिलांची त्याला खूप आठवण येत होती. त्यामुळे नोकरी सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला. आता केरळमध्ये परत येऊन कमळाची शेती करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ९ महिन्यात कमळाच्या शेतीतून महिन्याला ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत कमाई केली. लवकरच हा व्यवसाय ते वाढवणार आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, ''मी केरळचा आहे. एर्नाकुलममधून नर्सिंगचा अभ्यास केला. कोर्स संपल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी कोलकाता येथे गेलो, पण तेथे नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मुंबईला गेलो. तेथील रुग्णालयात ३ वर्षे काम केले. एकदा कतारला मुलाखत दिली. पैसे चांगले मिळत होते, म्हणून तिथे काम करण्यास सुरवात केली. पण कुटुंबीय केरळमध्येच होते. चांगला पगार असूनही कुटुंबापासून दूर असल्याची खंत होती. तिथे राहून कुटुंबाला वारंवार भेट देणे शक्य नव्हते, म्हणून मी २०१९ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन घरी परतलो.''
पुढे त्यांनी सांगितले की. '' मी राजीनामा दिल्यावर मला वाटले की मला दहा वर्षांचा अनुभव आहे. नोकरी कुठेतरी मिळेल, पण तसे झाले नाही. जानेवारीपासून लॉकडाउन होईपर्यंत मी नोकरीच्या शोधात फिरत होतो. केरळमध्ये आल्यानंतर पैसे देखील संपत चालले होते आणि कुटुंब कसे चालवायचे याची चिंता होती, कारण मी घरी एकटा कमावणारा होतो. मला लहानपणापासूनच बागकाम करण्याची आवड आहे. मी वेगवेगळे कमळ विकत घेऊन घरात ठेवत असे. मार्चमध्ये मला वाटले की मी कमळ ऑनलाइन का विकू नये. घराच्याच छतावर माझ्याकडे बाग आहे. इतर अनेक देशांसह कमळांच्या ४० हून अधिक प्रजाती आहेत. ही कल्पना पाहिल्यानंतर, मी यूट्यूबवर कमळ लागवडीशी संबंधित व्हिडीओ पाहिले. यामुळे मला चांगली शेती कशी करावी याविषयी अधिक कल्पना मिळाल्या.
त्यानंतर कमळांची थायलंड, युरोप आणि अमेरिकेतून आयात केली. संपूर्ण कामात सुमारे 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. यात कोणतंही पेड प्रमोशन केलं नव्हतं. फेसबुक, इंस्टाग्रामवर एक पेज तयार केले आणि त्यात दररोज कमळाचे फोटो शेअर करत होते. काही दिवसांनी मला गुजरातकडून पहिला फोन आला. त्यांना आपल्या घरी ठेवण्यासाठी एक फूल आवडले. ते माझा पहिला ग्राहक झाले. त्यानंतर दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे अशा सर्व शहरांतून फोन येऊ लागले.'' असं ही त्यांनी सांगितले
लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का? पाहा झक्कास फोटो
ऑर्डरबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ''केवळ फुलंच नाही तर संपूर्ण झाडाची मागणीही येत होती. ऑर्डर मिळाल्यानंतर मी भांड्यातील घाण स्वच्छ करतो. पाणी काढून टाकतो नंतर पॅक करतो आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. पॅक केल्यावर वनस्पती सुमारे १२ दिवस जगू शकते आणि मूळ आणखी काही दिवसांपर्यंत चांगले राहते. सुरूवातीलाच मी कशी लागवड करावे, ते कसे टिकवायचे याबद्दल मी माहिती देतो.''
हृदयद्रावक! आयसीयुमधील कोरोनाग्रस्त आजोबांना डॉक्टरांनी दिली हळवी गळाभेट, फोटो व्हायरल
एल्डहोस सध्या त्यांच्या १३०० चौरस फूट गच्चीवर लागवड करीत आहे. पण लवकरच त्याचा विस्तार होणार आहे. ते म्हणतात, ''मला बरेच कॉल येत आहेत आणि मी सध्या वितरणही करू शकत नाही. आत्ता महिन्याला ३० ते ३५ हजार रुपये मिळतात, पण जर स्टॉक वाढला तर उत्पन्नही वाढेल. परदेशातूनही अनेक कॉल आले आहेत, परंतु सध्या देशातच डिलिव्हरी वेळेत देण्यावर काम सुरू आहे.''