Elephant teeth Price : हस्तीदंताबाबत तर तुम्ही अनेकदा खूपकाही ऐकलं असेल, जगभरात हत्तीच्या दातांना खूप मागणी असते. ज्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, हस्तीदंताची जगभरात इतकी डिमांड का असते? अनेक लोक हस्तीदंताची तस्करी करतात आणि यामुळे दरवर्षी अनेक हत्ती मारले जातात.
काही लोक यांचा वापर सजावटीसाठी करतात तर काही लोक यापासून दागिने बनवतात. हत्तीच्या दातांपासून तयार केलेल्या बांगड्या आणि काही गळ्यातील दानिने फार लोकप्रिय आहेत. पण याची किंमत इतकी जास्त का असते याचा तुम्हाला कधीना कधी प्रश्न पडला असेलच.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, यात इतकं काय खास आहे आणि या हस्तीदंताची किंमत इतकी का जास्त असते. त्यासोबत हस्तीदंताबाबत काही खास बाबीही सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्ही हैराण व्हाल.
मुळात हस्तीदंताचं काही आंतरिक मूल्य नाहीये. म्हणजे यात असं कोणतही तत्व नाही, ज्यामुळे ते इतकं खास मानलं जातं. याचं सांस्कृतिक मूल्य जास्त आहे. म्हणजे हस्तीदंताला श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच ज्यांच्याकडे हे असेल ते श्रीमंत आहेत. कारण जास्तीत जास्त राजांच्या घरात हे बघितले गेले आहेत. त्यामुळे याची किंमत जास्त मानली जाते.
किती रूपये किलो?
जर किंमतीबाबत सांगायचं तर याची काही अशी एक फिक्स किंमत नाही. पण हे नक्की आहे की, हे महागडं आहे. काही वर्षाआधी पश्चिम बंगालमध्ये 17किलो हस्तीदंताची तस्करी पकडण्यात आली होती. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साधारण 1 कोटी 70 लाख रूपये अंदाजे ठरवण्यात आली होती. म्हणजे यावरून अंदाज लावून शकता की, हस्तीदंताची एका किलोची किंमत 10 लाख रूपये असू शकते.
एक्सपर्टनुसार, हस्तीदंताचा जास्त वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. गळ्यातील हार, बांगड्या, शर्टचे बटन यापासून तयार केले जातात. खासकरून श्रीमंत परिवारांमध्ये याची जास्त डिमांड असते.
जुन्या काळात राजघराण्यांमध्ये याला खूप डिमांड होती. हिंदू लोकांमध्ये हत्तीच्या मुखाला गणेशाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे लोक हस्तीदंत घरात ठेवणं पसंत करत होते. पण हळूहळू हे इतकं वीभत्स झालं की, हत्तींचा यासाठी जीव घेतला जाऊ लागला. अनेक देशांमध्ये हत्तीचे दात काढण्यावर बंदी आहे. पण तरीही काही लोक त्यांचा जीव घेऊन दातांची तस्करी करतात.