Elephant Viral Video: हत्तीने पोलिस स्टेशनवर केला हल्ला, समोर आला थरारक व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:30 PM2022-01-04T18:30:55+5:302022-01-04T18:31:09+5:30
Elephant Viral Video: या व्हिडिओला 3,000 हून अधिक व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.
सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओत केरळमधील एका पोलिस स्टेशनवर हत्तीने हल्ला केल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील पारंबीकुलम पोलीस स्टेशनमध्ये हत्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
പറമ്പിക്കുളം പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ എത്തിയ അമ്മയും കുഞ്ഞും ചെയ്തതെന്തന്നറിയാൻ വീഡിയോ കാണുക.#keralapolicepic.twitter.com/ZYZVkYH1G9
— Kerala Police (@TheKeralaPolice) January 2, 2022
अचानक आला हत्ती
या घटनेच्या व्हिडिओमध्ये हत्ती आणि त्याचे बाळ लोखंडी जाळीच्या मागून स्टेशनमध्ये डोकावताना दिसत आहे. आत येण्याच्या प्रयत्नात हत्तीने पोलीस स्टेशनचे लोखंडी ग्रीलही तोडल्याचे व्हिडिओ दिसत आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण पोलीस स्टेशनचे थोडे नुकसान झाले. दरम्यान, हत्तीने असे का केले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 2 जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओला 3,000 हून अधिक व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.
केरळ पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ केरळ पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि मल्याळममध्ये कॅप्शन दिले की, 'आई आणि मुलाने पारंबीकुलम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर काय केले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.' केरळ पोलिसांनी सस्पेन्स क्रिएट करण्यासाठी क्लिपमध्ये काही संवाद आणि संगीतही जोडले आहे. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, हत्ती गेट तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'कुबेरन' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग 'सतीर्थ्यो' हा शब्द ऐकू येतो.